साऊदम्पटन : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC final) काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पण सामन्यापूर्वीच न्यूझीलंडने काही असे केले आहे ज्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडला त्याच्यांच मैदानात 2 कसोटी सामन्याच्या सिरीजमध्ये 1-0 ने पराभूत करत विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने भारताला जणू एक चेतावनीच दिली आहे. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या टेस्टमध्ये 8 विकेट्सने इंग्लंडला नमवत विजय मिळवला. (In Practise Match New Zealand beat England before WTC final India need to do worry about kiwis form)
पहिल्या सामन्यात कडवी झुंज दिल्यावर न्यूझीलंडने सामना अनिर्णीत केला. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना सुरुवातीला चुरशीचा झाला. पहिल्या डावात इंग्लंडने 303 धावा केल्या, ज्याच्या उत्तरात न्यूझीलंडने 388 धावा करत 85 धावांची लीड घेतली. ज्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडला अवघ्या 122 धावांवर ऑलआऊट केले. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 38 धावांची गरज होती. जी न्यूझीलंडने 10.5 ओव्हरमध्ये दोन विकेटच्या बदल्य़ात पूर्ण करत सामना आपल्या नावे केला.
इंग्लंडवर मिळवलेल्या विजयादरम्यान न्यूझीलंडच्या संघात कर्णधार केन विल्यमसनसह बरेच महत्त्वाचे खेळाडू नव्हते. तरी देखील इंग्लंडवर मिळवलेल्या या विजयामुळे भारतीय संघाला न्यूझीलंड विरोधात तगडी रणनीती आखून अप्रतिम खेळ दाखवावा लागणार आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजीसह गोलंदाजीतील कडक फॉर्मचा विचार करुनच भारतीय संघाला WTC Final मध्ये खेळावे लागणार आहे. यावेळी
खेळपट्टीचा योग्य अभ्यास करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल.
1. साऊदम्पटनची खेळपट्टी भारतापेक्षा न्यूझीलंडच्या गोलंदाजासाठी अधिक चांगली आहे.
2. याआधीच्या कसोटी सामन्यांत न्यूझीलंडने भारताविरुद्ध अप्रतिम प्रदर्शन केले आहे.
3. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात याआधी झालेली कसोटी मालिका भारत 2-0 च्या फरकाने पराभूत झाला आहे. याचा मानसिक परिणामही संघावर होऊ शकतो.
4. न्यूझीलंडचा संघ मागील बऱ्याच काळापासून इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे तेथील वातावरण खेळपट्टीवर त्यांचा चांगला जम बसला आहे.
या विजयासह न्यूझीलंड आयसीसीच्या कसोटी संघाच्या (ICC Test Ranking) क्रमवारीत भारताला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ क्रमवारीत 120 पॉइंट्सह दुसऱ्या स्थानावर होता तर भारत पहिल्या स्थानी विराजमान होता. मात्र दोन्ही संघात केवळ एका गुणाचा फरक होता. या विजयासह न्यूझीलंडचे 123 पॉईंट्स झाले आहेत. ज्यामुळे ते पहिल्या स्थानी पोहोचले असून भारत दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
हे ही वाचा :
WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये
WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?
(In Practise Match New Zealand beat England before WTC final India need to do worry about kiwis form)