SMAT 2021: ‘बर्थडे बॉय’ पृथ्वी शॉ चा धमाका, 83 धाव ठोकत मुंबईला मिळवून दिला विजय, BCCI बर्थडे गिफ्ट देणार का?

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ या वाढदिवस असून त्याने याच दिवशी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईकडून खेळताना एक धमाकेदार खेळी खेळली आहे.

SMAT 2021: ‘बर्थडे बॉय’ पृथ्वी शॉ चा धमाका, 83 धाव ठोकत मुंबईला मिळवून दिला विजय, BCCI बर्थडे गिफ्ट देणार का?
पृथ्वी शॉ
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 2:56 PM

मुंबई: सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत (SMAT 2021) मुंबई संघाने वडोदरा संघावर अप्रतिम विजय मिळवला आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला आहे बर्थडे बॉय पृथ्वी शॉ (Prithvi Shaw). पृथ्वी याचा आज (9 नोव्हेंबर) वाढदिवस असून त्याने  83 धावांची अप्रतिम खेळी केली आहे. विशेष म्हणजे पृथ्वीला त्याच्या वाढदिवसादिवशी बर्थ-डे गिफ्टही मिळू शकतं. लवकरच न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची निवड होणार असून यावेळी T20 मालिकेसाठी पृथ्वीला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे बीसीसीआय पृथ्वीला बर्थडे गिफ्ट देणार का? हीच चर्चा आहे.

मुंबईने वडोदरा संघाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. गुवाहाटीच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेने मुंबईकडून सुरुवात केली. दोघांनी अप्रतिम अशी 151 धावांची मोठी भागिदारी रचली. अजिंक्य रहाणेने 45 चेंडूत 71 धावा करुन बाद झाला. ज्यानंतरही पृथ्वीने पुढे किल्ला लढवला. त्याने 63 चेंडूत 83 धावा ठोकल्या. यावेळी त्याने 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. ज्यानंतर शिवम दुबेने नाबाद 23 धावा करत मुंबईच्या स्कोरबोर्डवर 193 धावा लगावल्या.

82 धावांनी मुंबई विजयी, 83 धावा करणारा पृथ्वी ठरला हिरो

मुंबईने ठेवलेल्या 194 धावांचा सामना करण्यासाठी आलेल्या वडोदरा संघाचा डाव 111 धावांवरच संपला. ते 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या बदल्यात 111 धावाच करु शकल्याने मुंबईचा संघ 82 धावांनी विजयी झाला. मुंबईत्या तनुस कोट्यानने 4 ओव्हरमध्ये 16 धावा देत 4 विकेट्स टिपल्या.

इतर बातम्या

India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय

विराटने इशाऱ्यांमध्ये सांगितलं भावी कर्णधाराचं नाव, विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात कोहली भावूक

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती, ऋतुराज गायकवाडची जागा पक्की, रोहितकडे कर्णधारपद?

(In syyed mushtaq ali trophy 2021 birthday boy prithvi shaw played 83 runs inning and mumbai won the match)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.