T20 World Cup 2021: बांग्लादेशचा पीएनजीवर 84 धावांनी विजय, सुपर 12 तिकिटंही मिळवलं
टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात बांग्लादेश संघाने पापुआ न्यू गिनी संघाला तब्बल 84 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयासह त्यांनी सुपर 12 मध्येही दिमाखात स्थान मिळवलं आहे.
T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यांना सुरुवात झाली असून ग्रुप स्टेजेसचे सामने आता संपत आले आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या बांग्लादेश विरुद्ध पापुआ न्यू गिनी या सामन्यात बांग्लादेशने 84 धावांनी विजय मिळवत थेट सुपर 12 फेरीचं तिकीट मिळवलं आहे. सुरुवातीला स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागलेल्या बांग्लादेशने कमबॅक करत ओमान आणि आता पापुआ न्यू गिनी संघाला मात देत पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे.
A talismanic performance from Shakib Al Hasan enabled Bangladesh’s safe passage through to the Super 12 ? #BANvPNG report ?#T20WorldCup https://t.co/fOLDQIZEEp
— ICC (@ICC) October 21, 2021
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत बांग्लादेश संघाने फलंदाजी निवडली. हा निर्णय त्यांच्यासाठी चांगला ठरला कारण फलंदाजानी दमदरा फलंदाजी करत 181 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये महमदुल्ला आणि शाकिब अल हसन यांनी अनुक्रमे 50 आणि 46 धावांचं योगदान दिलं. तर अफिफ हुसेन (21) आणि लिटॉन दास (29) यांनीही चांगली फलंदाजी केली. ज्याच्या जोरावर बांग्लादेशने 182 धावांचे आव्हान पीएनजी संघासमोर ठेवले.
100 धावांच्या आत पीएनजी सर्वबाद
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पीएनजी संघाचे फलंदाज सुरुवातीपासूनच खराब कामगिरी करु लागले. किपलीन दोरीगा याने अखेरपर्यंत एकहाती झुंज दिली तो 46 धावांवर नाबाद राहिला. पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने सर्व संघ 97 धावांवर सर्वबाद झाला आणि बांग्लादेशचा 84 धावांनी विजय झाला. यावेळी शाकिबने फलंजदाजीत 46 धावा ठोकत गोलंदाजीतही 4 ओव्हरमध्ये केवळ 9 धावा देत तब्बल 4 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे त्यालाच सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
हे ही वाचा-
‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’
T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास
(In T20 World Cup 2021 Bangladesh won by 84 runs in match against Papua New Guinea and enters in super 12)