T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका

आगामी टी-20 विश्वचषकाला सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या भव्य स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या 15 सदस्यायी संघाची घोषणा याआधीच केली होती. दरम्यान त्यांनी यामध्ये नुकतेच तीन बदल देखील केले. पण त्यानंतर आता संघाला आणखी एक झटका बसला आहे.

T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 6:10 PM

कराची :  बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. काही दिवसांतच या स्पर्धेचा थरार युएईत पाहायला मिळणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपले अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. बऱ्याच आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले. पण या बदलानंतर आता संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. संघाचे परफॉर्मंस प्रशिक्षक प्रमुख ग्रँट ब्रॅडबर्न (Grant Bradburn) यांनी राजीनामा दिला आहे. न्यूझीलंडचे माजी खेळाडू असणारे ग्रँट 3 वर्षांपासून पाकिस्तान संघासोबत होते. सप्टेंबर 2018 ते जून 2020 या काळात त्यांनी पाकिस्तान संघाचे फील्डिंग कोच म्हणूनही कार्यभार सांभाळला होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार ब्रॅडबर्न म्हणाले, ”पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणं माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. मी सोनेरी आठवणी आणि शानदार अनुभव सोबत घेऊन जात आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पीसीबीचे धन्यवाद देऊ इच्छितो.” विशेष गोष्ट म्हणजे रमीज राजा पीसीबीचा चेअरमन होताच ब्रॅडबर्न हा पाचवा अधिकारी आहे. ज्याने संघाची साथ सोडली आहे. याआधी पाकिस्तानचा मुख्य कोच मिसबाह उल हक, गोलंदाजी कोच वकार युनूस, सीईओ वसीम खान आणि मार्केटिंग हेड बाबर हमीद यांनीही राजीनामा दिला आहे.

पाकिस्तानकडून संघात 3 बदल

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपल्या अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. सर्वात आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ :

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, सरफराज अहमद, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, फखर जमान, मोहम्मद हफीज, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन आफ्रीदी

राखीव खेळाडू : खुशदिल शाह, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणदे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

हे ही वाचा

“भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा”, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

(In T20 world cup 2021 before india vs pakistan match pakistans head of high performance coaching grant bradburn gives resign)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.