T20 World Cup 2021: कर्टिस कँफरची कमाल गोलंदाजी, आयर्लंडचा नेदरलँड्सवर 7 विकेट्सने विजय
टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून आज ग्रुप स्टेजमधील नेदरलँड विरुद्ध आयर्लंड हा सामना पार पडला. सामन्यात आयर्लंडच्या कर्टिसने उत्कृष्ट गोलंदाजी करत एक धमाकेदार रेकॉर्डची नोंद केली.
T20 World Cup 2021: टी20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजेसमधील सामने सुरु आहेत. पण हे सामने अगदी धमाकेदार होत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकत्याच झालेल्या नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड (Netharland vs Ireland) या जागतिक क्रिकेटमधील कमी ताकदीच्या संघामध्ये आयर्लंडने विजय दमदार विजय मिळवला आहे. आयर्लंडने नेदरलँड्सला 7 विकेट्सनी मात दिली आहे. या सामन्यात विशेष म्हणजे आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफर (Curtis Campher) याने नेदरलँडच्या 4 फलंदाजाना सलग 4 चेंडूवर तंबूत धाडण्याचा विक्रम केला.
सामन्यात नेदरलँड्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. नेदरलँड्सचा सलामीवीर मॅक्स डोवे़डने अर्धशतक ठोकत 51 धावा केल्या. त्याच्याशिवाय कोणत्याच खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. अखेरच्या काही चेंडूत सेलार याने 21 धावा करत संघाला 100 धावांच्या दिशेने नेलं. ज्यामुळे त्यांनी केवळ 106 धावा करत आयर्लंडसमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान ठेवले. ज्याचा पाठलाग करताना आयर्लंडने केवळ 15.1 ओव्हरमध्येच अवघ्या 3 विकेट्स गमावत हे आव्हान गाठलं. त्यांच्याकडून सलामीवीर पॉलने नाबाद 30 आणि डेलनी याने 44 धावा करत संघाचा विजय पक्का केला.
Curtis Campher stole the show for Ireland as they registered a seven-wicket victory over Netherlands ?#IREvNED report ?#T20WorldCup https://t.co/ZaYVNINrpl
— ICC (@ICC) October 18, 2021
कर्टीसची कमाल
आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफरने डावातील 10 व्या षटकात कमालीची गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या चेंडूपासून पाचव्या चेंडूपर्यंत हे 4 बळी टिपले. कर्टीसने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कॉलिन एकरमॅनला 11 धावांवर नील रॉकच्या हाती झेलबाद केले. त्याने रियान टेन डोइशे आणि स्कॉट एडवर्ड्स यांना तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पायचीत केले. ज्यानंतर पाचव्या चेंडूवर रूलोफ वॅन डेर मेर्वेला त्रिफळाचित करत त्याने दमदार रेकॉर्ड स्वत:च्या नावे केला.
View this post on Instagram
टी20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज
याआधी राशिद खानने 2019 मध्ये आयर्लंड संघाविरुद्ध तर लसिथ मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध 4 चेंडूत 4 विकेट्स घेतले होते. तर टी 20 वर्ल्ड कपचा विचार करता आतापर्यंत तीन चेंडूवर तीन विकेट्सच पडल्या असून ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने 2007 मध्ये बांग्लादेशविरुद्ध ही कमाल केली होती. त्यानंतर आज कर्टिसने हॅट्रिकसह आणखी एक विकेट घेतला आहे.
हे ही वाचा
…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा
कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?
T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो
(In T20 world cup 2021 in Ireland vs Netharlands match Irelands Curtis campher picked up 4 Wickets in 4 Balls new record set and ireland win match with 7 wickets)