India vs Pakistan, T20 World cup 2021: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकली का?, सर्वात महागडं तिकीट लाखाच्या घरात
24 ऑक्टोबर रोजी दुबईच्या मैदानात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याठी सर्वच क्रिकेटप्रेमींची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. पण या भव्य सामन्याच्या तिकीटाची नेमकी किंमत आहे तरी किती?
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. पण भारतीयासांठी मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धा रविवारी (24 ऑक्टोबर) सुरु होईल. कारण याच दिवशी भारताचा यंदाच्या विश्वचषकातील सामना आणि तोही कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध (India vs Pakistan) असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील नागरिक तर उत्सुक आहेतच. पण विचार करा जे क्रिकेटप्रेमी सामना पाहण्यासाठी मैदानात जाणार आहेत. त्यांची उत्सुकता किती असेल. पण तुम्ही हा विचार केला आहेका की या चाहत्यांना नेमकी किती किंमत तिकीट विकत घेण्यासाठी मोजावी लागणार आहे. तर ही किंमत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
यंदाच्या विश्वचषकाच्या सामन्यांना स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयच्या (BCCI) विनंतीनंतर यूएई सरकारने हा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे सामन्यांना प्रेक्षक दिसत असून अशात भारत विरुद्ध पाकिस्तान ही इतक्या वर्षांची लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांसह इतरही क्रिकेटप्रेमी जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळेच या सामन्याची तिकीट तितकीच महाग असून सामन्य तिकीटापेक्षा अधिक किंमत या सामन्याच्या तिकीटासाठी मोजावी लागणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्टँडसाठी वेगवेगळी किंमत आहे. ज्यात सर्वांत मागे 12 हजार 500 भारतीय चलणानुसार मोजावे लागणार असून त्यानंतर 31 हजार 200 ते 54 हजार 100 रुपयांपर्यंत तिकीटं आहेत. तर सर्वात महागडं तिकीट 2 लाख रुपयांच्या घरात आहे.
आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान टी20
2007 टी -20 विश्वचषकात आधी ग्रुप मॅच दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बरोबरीत संपला. ज्यानंतर बॉल आऊटद्वारे निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर 2007 साली अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला नमवत ट्रॉफी जिंकली. त्यानंतर 2012 मध्ये सुपर 8 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. त्याचप्रमाणे 2014 मध्येही सुपर 10 मध्ये प्रथम खेळताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 3 गड्यांच्या बदल्यात 9 चेंडूं राखून हा सामना जिंकला. ज्यानंतर अखेरचा टी20 सामना 2016 मध्ये झाला ज्यात पावसामुळे सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला. त्यातही भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केले.
2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने
टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
हे ही वाचा-
पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!
(In t20 world cup 2021 India vs Pakistan match ticket price in lakhs)