T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री
यंदा टी20 विश्वचषकात खेळणाऱ्या नामिबीया संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुपर 12 फेरीत स्थान मिळवले आहे. आयर्लंड संघाला 8 विकट्सने मात देत त्यांनी सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे.
T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup) सामने अगदी चुरशीत सुरु आहेत. ग्रुप स्टेजेसचे सामने संपले असून आता उद्यापासून (23 ऑक्टोबर) सुपर 12 फेरीचे सामने सुरु होतील. पण या सामन्यांपूर्वीच आज एक ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. टी2o विश्वचषकाच्या इतिहासांत प्रथमच नामिबीया क्रिकेट संघ (Namibia Cricket team in super 12) सुपर 12 फेरीत पोहचण्यात यशस्वी झाला आहे. स्कॉटलंड पाठोपाठ नामिबीयाचा संघही भारत असलेल्या ग्रुप 2 मध्येच गेला आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगानिस्ताननंतर आता स्कॉटलंड आणि नामिबीया हे संघ आहेत.
The moment history was made ?️#T20WorldCup #NAMvIRE https://t.co/z4EsE5RBy9
— ICC (@ICC) October 22, 2021
आयर्लंड आणि नामिबीया यांच्यातील आजच्या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत आयर्लंड संघाने फलंदाजी निवडली. पण स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंजाजी करत आयर्लंडचा गाडा 125 धावांवर रोखला यावेळी सलामीवीर स्टर्लिंग आणि केविन यांनी अनुक्रमे (38) आणि (25) धावा केल्या. त्यानंतर केवळ बालबिर्ने याने 21 धावा केल्या असून पुढील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. ज्यामुळे सर्व संघ 125 धावांच करु शकला.
एरासमसचं अप्रतिम अर्धशतक आणि नामिबीया विजयी
126 धावांचे सोपे आव्हान नामिबीया संघाने केवळ 2 विकेट्स गमावत 18.3 षटकांत पूर्ण करत विजय मिळवला. यावेळी सलामीवीर विल्यम्स आणि ग्रीन यांनी अनुक्रमे 15 आणि 24 धावा करत चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या बाद झाल्यानंतर फलंदाज जेरहार्ड एरासमसने दमदार अर्धशतक लगावत नाबाद 53 धावा ठोकल्या. ज्यामुळे संघाचा विजय सोपा झाला. त्याला डेविड विस्से याने नाबाद 28 धावांची साथ देत संघाला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. आता नामिबियाचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंड संघाशी असेल. तर 8 नोव्हेंबर रोजी भारताशी देखील नामिबीयाचा संघ दोन हात करणार आहे.
हे ही वाचा-
पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!
(In T20 world Cup 2021 Ireland vs Namibia match Namibia won with 8 wickets and enters in Super 12)