T20 World Cup मध्ये कोण कमाल करणार? कोहली की रोहित? ब्रेट लीनं तिसरंच नाव सांगितलं!

आगामी टी20 विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाने संघ जाहीर केल्यानंतर नुकताच त्यात एक बदल करत शार्दूलला मुख्य संघात घेत अक्षरला राखीवमध्ये टाकले आहे. आता या तयार संघातील कोणता खेळाडू स्पर्धेत कमाल करेल? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

T20 World Cup मध्ये कोण कमाल करणार? कोहली की रोहित? ब्रेट लीनं तिसरंच नाव सांगितलं!
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 5:11 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) आगामी टी20 विश्वचषकात (T20 Wolrd Cup) कोणता भारतीय फलंदाज कमाल करणार? याची भविष्यवाणी केली आहे. लीच्या मते सध्या खेळाडूंचा फॉर्म पाहता युवा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) टी20 विश्व चषकात (T20 World Cup 2021) कमाल करु शकतो. त्यामुळे त्याला योग्य स्थानी फलंदाजीला पाठवून विराट-रोहितवरील भार कमी करुन संघाने फायदा करु घेतला पाहिजे.

ली याला यंदा भारतीय संघ हा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असेल असं वाटत आहे. भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी सामन्यांना सुरुवात करणार असून पहिलाच सामना पाकिस्तान संघाशी खेळणार आहे. दरम्यान ली ‘फॉक्स स्पोटर्स’ शी बोलताना म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ हा अनुभवाच्या दृष्टीने एक ताकदवर संघ असला तरी माझ्यामते भारत हा स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे. इंडियन प्रीमियर लीगमुळे भारताला अनेक युवा खेळाडू मिळाले आहेत. यामध्ये काही वेगवानल गोलंदाज आहेतच. पण भारताची सलामी फलंदाजीही ताकदवर झाली आहे. ज्यामुळे भारत वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार आहे.’

‘केएल राहुल सर्वाधिक धावा करणार’

ली केएल राहुल बद्दल बोलताना म्हणाला, ‘राहुल टी20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. त्याने आयपीएल 2021 मध्येही सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्यात यूएईत त्याने 6सामन्यात 295 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने विश्वचषकात राहुलला महत्त्वाचा फलंदाज म्हणून खेळवलं पाहिजे. ज्यामुळे त्याचं प्रदर्शन अजून सुधारेल आणि संघाला फायदा होईल.’

सूर्या आहे पुढील ‘स्टार’

लीने सूर्यकुमार यादवचंही कौतुक केलं. तो म्हणाला, ‘मला वाटतं सूर्या हा भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील सुपरस्टार आहे. तसचं पुढे बोलताना तो म्हणाला, ‘मला भारतीय संघ ताकदवर वाटत असला तरी मी देशभक्त असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघच जिंकावा असं मला वाटतं. पण भारत नक्कीच फायनलपर्यंत बाजी मारेल.”

इतर बातम्या

KKR फायनलमध्ये पण दिनेश कार्तिकला शिक्षा, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी, IPL ने फटकारले

IPL 2021: दिल्लीविरुद्ध केकेआर सामन्यात पाहायला मिळालं अजब दृश्य, तंबूत परतलेल्या शिमरॉनला पंचानी पुन्हा बोलवलं, नेमकं काय घडलं?

1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!

(In T20 world cup 2021 kl rahul will play special role says brett lee)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.