T20 World Cup 2021: पाकिस्तानची विजयी घोडदौड सुरुच, न्यूझीलंडला 5 विकेट्सनी मात देत स्पर्धेतील दुसरा विजय
पहिल्या सामन्यात भारताला 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता पाकिस्तान संघाने बलाढ्य न्यूझीलंड संघाला 5 विकेट्सनी मात देत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे.
T20 Cricket World Cup 2021: पाकिस्तान क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बलाढ्य न्यूझीलंड संघाला 5 विकेट्सने मात देत पाकिस्तानने गुणतालिकेतही पहिलं स्थान गाठलं आहे. शारजाहच्या मैदानात पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New zealand vs Pakistan) सामन्यात पाकने आधी गोलंदाजी करत न्यूझीलंडला 134 धावांवर रोखलं. त्यानंतर मात्र 135 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना पाकिस्तानला अडचणी आल्या पण अनुभवी शोएब मलिक आणि असिफ अली यांनी नाबाद खेळी करत संघाला 5 विकेट्सनी जिंकवून दिलं.
A late blitz from Asif Ali and Shoaib Malik helped Pakistan continue their momentum at the #T20WorldCup 2021 ? #PAKvNZ report ? https://t.co/sjTSVOj61x
— ICC (@ICC) October 26, 2021
सामन्यात नाणेफेक जिंकत पाकने भारताविरुद्ध घेतला तसाच गोलंदाजीचा निर्णय घेतल. सामन्यात सुरुवातीला न्यूझीलंडने थोडी चागंली सुरुवात केली. 36 धावांवर गप्टील 17 धावा करुन बाद झाला. त्यानंतर डॅरिन मिचेल आणि कर्णधार विल्यममनने एक चांगली भागिदारी केली. दोघांनी अनुक्रमे 27 आणि 25 धावा केल्या. त्यांच्यानंतर डेवन कॉन्वेने ही 27 धावा करत संघाला एक चांगलं टार्गेट मिळवून दिलं. यावेळीही भारताविरुद्ध पाक सामन्याप्रमाणे पाकच्.ा गोलंदाजानी अप्रतिम गोलंजाजी केली. रॉफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शाहीन, इमाद आणि हाफिज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
मलिक-असिफ अलीने फिनिश केला सामना
135 धावांसारखं छोटं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाचे सुरुवातीचे फलंदाज अगदी कमी धावा करत तंबूत गेले. केवळ सलामीवीर रिजवानने 33 धावा केल्या. मधली फळीही बाद होत असताना सर्वात अनुभवी शोएब मलिकने असिफ अली सोबत विजयी भागिदारी केली. यावेळ मलिकने 20 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 26 धावा केल्या. तर असिफ अलीने 12 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 27 धावा केल्या. त्यांनी 8 चेंडू आणि 5 गडी राखून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
इतर बातम्या
T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!
मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी
T20 World Cup 2021: वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने 8 गडी राखून दिली मात
(In T20 World Cup 2021 New zealand vs Pakistan match Pakistan beat new zealand with 5 wickets in hands)