T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी

टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजसच्या सामन्यातील अखेरचा सामना श्रीलंका आणि नेदरलँड्स संघात झाला. यामध्ये अप्रतिम गोलंदाजीच्या मदतीने श्रीलंका संघाने 8 विकेट्सनी विजय मिळवला आहे.

T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी
श्रीलंका संघ
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 12:46 AM

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup) ग्रुप स्टेजचे सामने अखेर संपले आहेत. श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स (Sri lanka vs Netharlands) यांच्यातील सामन्याने ग्रुप स्टेजच्या सामन्याची सांगता झाली. या ग्रुप स्टेजमधून बांग्लादेश, स्कॉटलंड, नामिबिया आणि श्रीलंका हे संघ सुपर 12 मध्ये गेले आहेत. आता उद्यापासून (23 ऑक्टोबर) सुपर 12 फेरीचे सामने सुरु होतील. दरम्यान ग्रुप स्टेजसचे सामने हे कमी ताकदवर संघात असले तरी यात अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या. जसेकी स्कॉटलंडच्या कर्टिसने 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर आता श्रीलंका संघाने नेदरलँड्सला 44 धावांमध्ये सर्वबाद करत 7.1 षटकांत हे आव्हान पारही करुन दाखवलं आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजी निवडली. कर्णधार शनाकाचा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजानी अगदी बरोबर करुन दाखवत उत्कृष्ट गोलंदाजी करत नेदरलँड्सचा डाव 44 धावांमध्ये आटोपला. यावेळी नेदरलँड्सचा अॅकरमान याने सर्वाधिक 11 धावा केल्या. विशेष म्हणजे 4 फलंदाजानातर साधे खातेही खोलता आले नाही. तर श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि एल कुमारा यांनी उत्तम गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर एम थिकशानाने 2 आणि चामिराने एक विकेट घेतला.

8 विकेट्सनी श्रीलंका विजयी

अवघ्या 45 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाने सहज विजय मिळवला. पण त्यांना दोन विकेट्स मात्र गमवावे लागले. यावेळी सलामीवीर पाथूम निसांका शून्यावर बाद झाल्यानंतर कुसल परेराने मात्र नाबाद 33 धावा लगावल्या. तर असलांकाने 6 आणि ए फर्नांडोने नाबाद 2 धावा करत संघाचा विजय पक्का केला. या विजयासह श्रीलंका सुपर 12 मध्ये गेली असून त्यांना ग्रुप 1 मध्ये टाकण्यात आलं आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका या संघासोबत आता ग्रुप स्टेजमधून गेलेले बांग्लादेश आणि श्रीलंका हे संघ आहेत.

हे ही वाचा-

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ संघ घेऊन खेळल्यास विजय सोपा, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले अंतिम 11

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

(In T20 world Cup 2021 Sri lanka vs Netharlands match with Good Bowling Attack Sri lanka won match in 7 overs with 8 wickets in hand)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.