India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

भारतीय संघाने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला असून आता भारतीय खेळाडू थेट 24 ऑक्टोबर रोजी विश्वचषकातील पहिल्या सामन्यातचं मैदानात उतरतील. पण यावेळी त्यांच्यासमोर सराव सामना नसून मुख्य सामना असेल आणि सोबतच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान...

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास
भारत विरुद्ध पाकिस्तान
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 4:24 PM

दुबई: टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली असली तरी भारती आणि पाकिस्तान देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष मात्र 24 ऑक्टोबर या तारखेकडे लागले आहे. सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला सामना 24 तारखेला पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) असणार आहे. विश्वचषकातील पहिलाच सामना असण्याबरोबर हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असल्याने भारतीय खेळाडू विजयासाठी सर्व शक्य प्रयत्न करणार हे नक्की!

हा सामना दोन्ही संघासाठी तितकाच महत्त्वाचा आहे कारण या सामन्यातून त्यांचे विश्वचषकातील भविष्य स्पष्ट होईल. त्यामुळे या सामन्यापूर्वी दोघांतील आतापर्यंतच्या सामन्यांच्या इतिहासावर एक नजर फिरवूया… टी – 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. पण प्रत्येक वेळी पाकिस्तानवर भारतीय संघाने सरशी करत विजयश्री मिळवला आहे. सर्वात पहिला टी20 विश्वचषक 2007 साली झाला तेव्हापासून ही लढाई सुरु झाली जी आजवर सुरु आहे.

आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान टी20

2007 टी -20 विश्वचषकात आधी ग्रुप मॅच दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बरोबरीत संपला. ज्यानंतर बॉल आऊटद्वारे निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर 2007 साली अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला नमवत ट्रॉफी जिंकली. त्यानंतर 2012 मध्ये सुपर 8 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. त्याचप्रमाणे 2014 मध्येही सुपर 10 मध्ये प्रथम खेळताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 3 गड्यांच्या बदल्यात 9 चेंडूं राखून हा सामना जिंकला. ज्यानंतर अखेरचा टी20 सामना 2016 मध्ये झाला ज्यात पावसामुळे सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला. त्यातही भारताने पाकिस्तानला  6 गडी राखून पराभूत केले.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

ही वाचा-

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

T20 World Cup च्या 2 सराव सामन्यात केवळ 1 धाव, डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म आयपीएलमधील वर्तवणुकीमुळे गेला?

(In T20 World Cup India beat pakistan many times know history of india vs pakistan matches)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.