अबब! ‘या’ सामन्यात लागली 10 ‘शतकं’, धावांचा डोंगर, कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येपैकी एक

हा एक ऐतिहासिक सामना ठरला. ज्यात फलंदाज आणि गोलंदाजामुळे 10 शतकांची नोंद झाली. पण ही शतकं नेमकी कशी होती?

अबब! 'या' सामन्यात लागली 10 'शतकं', धावांचा डोंगर, कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येपैकी एक
कसोटी सामना (प्रतिकात्मक फोटो)
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 11:22 AM

किंग्स्टन : बातमीचं शीर्षक वाचून तुम्ही विचार करत असाल, क्रिकेटमध्ये एका संघात 11 खेळाडू त्यातील 10 जणांनी जर शतकं ठोकली. तरी हजारच्या पार धावसंख्या जाईल. पण तुम्ही हा विचार करण्याआधीच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही चर्चा ज्या मॅचची सुरु आहे ती एक कसोटी मॅच असून यामध्ये 5 शतकं फलंदाजानी ठोकली होती. तर 5 गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये प्रत्येकाला 100 हून अधिक धावा चोपण्यात आल्याने या संपूर्ण सामन्यात 10 शतकांची नोंद झाली. आता हे सर्व आज सांगण्याच कारण म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 15 जूनरोजी हा सामना टेस्ट क्रिकेटचे दिग्गज ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (Australia vs West Indies) या संघात पार पडला होता. (In Test Between Australia vs West Indies Five batsman scored Centurty Five Bowlers Conceded 100 runs)

ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज यांच्यात 11 ते 17 जून 1955 रोजी किंग्‍स्टनच्या मैदानात हा कसोटी सामना खेळवला गेला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्‍ट इंडीजने 357 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यात क्‍लाइड वॉलकॉटने 155, एवर्टन वीक्‍सने 56 आणि फ्रँक वॉरेलने 61 धावा लगावल्या. ऑस्‍ट्रेलियाच्या कीथ मिलर यांनी 6 विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या संघाला रोखलं. त्यानंतर ऑस्‍ट्रेलियाचा डाव सुरु झाला आणि 15 जूनपर्यंत ऑस्‍ट्रेलियाने 8 विकेट्सच्या बदल्यात तब्बल 758 धावांचा डोंगर रचला. हा स्कोर आजही ऑस्‍ट्रेलियाचा टेस्‍ट क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोर आहे.

7 धावांवर दोन विकेटनंतर लागली 5 शतकं

सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने एक मोठी धावसंख्या उभी केली असली तरी संघाची सुरुवात मात्र खराब झाली होती. अवघ्या 7 धावांवर दोन विकेट्स पडल्या असताना कोलिन मॅक्‍डोनाल्‍ड यांनी 127 धावा करत पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर जणू शतकांची रांगच लागली. चौथ्या नंबरचा फलंदाज नील हार्वे यांनी 204 धावा करत दुहेरी शतक ठोकलं. नीलनंतर लागोपाठ तिघा फलंदाजानी शतक लगावलं. यात कीथ मिलर यांनी 109, रोन आर्चर यांनी 128 आणि रिची बेनॉड यांनी 121 धावांची खेळी केली.

पहिल्यांदाच 5 गोलंदाजाना 100 हून अधिक धावा

ऑस्ट्रेलियाने केलेल्या या विशाल धावसंख्येमुळे विंडीजच्या 5 गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये प्रत्येकाला 100 हून अधिक धावा मिळाल्या. यामध्ये टॉम डेडने यांनी 24 ओव्हरमध्ये 115 धावा देत एक विकेट मिळवला. फ्रँक किंग यांनी 31 ओव्हमध्ये 126 धावांच्या बदल्यात दोन विकेट मिळवल्या. तर डेनिस एटकिंसन यांनी 55 ओव्हरमध्ये 132 धावांच्या बदल्यात एक विकेट घेतला. यानंतर कोलिन स्मिथने 145 धावांच्या बदल्यात दोन विकेट घेतल्या. तर फ्रँक वॉरेल यांनी 45 ओव्हरमध्ये एक विकेट घेत 116 धावा खाल्ल्या.

हे ही वाचा :

WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

(In Test Between Australia vs West Indies Five batsman scored Centurty Five Bowlers Conceded 100 runs)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.