TNPL 2023 : 50 रन्सवर 6 विकेट गेल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूची कमाल, 30 चेंडूत जिंकून दिली मॅच, VIDEO
TNPL 2023 : या परफॉर्मन्समुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजमध्ये नक्कीच त्याची निवड होऊ शकते. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट, वनडे आणि T20 सीरीज खेळणार आहे. सध्या टेस्ट आणि वनडेसाठी टीम जाहीर झालीय.
चेन्नई : टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरु होत आहे. यासाठी भारतीय खेळाडू 3 जुलैला कूच करतील. या दौऱ्यात टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरीज खेळणार आहे. टेस्ट आणि वनडेसाठी टीमची घोषणा झाली आहे. या दोन्ही टीममध्ये वॉशिंग्टन सुंदरच नाव नाहीय. आता तो TNPL मध्ये ज्या पद्धतीची इनिंग खेळलाय, ते पाहून वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजमध्ये त्याचं नाव नक्कीच असेल असं वाटतय.
तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये भारतीय ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरने आपल्या टीमला हरलेली मॅच जिंकून दिली. त्याच्या या खेळासाठी त्याला सिकंदर म्हटलं, तर चुकीच ठरणार नाही. तो फलंदाजासाठी उतरला, तेव्हा टीमची हालत खूप खराब होती. टीमच्या 100 धावा होणं सुद्धा कठीण दिसत होतं.
सुंदरने खेळाचा नूरच पालटला
TNPL मध्ये मदुरै पँथर्स आणि चेपॉक सुपर गिलीज दरम्यान ही मॅच होती. वॉशिंग्टन सुंदर मदुरै पँथर्सकडून खेळत होता. त्यांची टीम मैदानात उतरल्यानंतर खूप खराब सुरुवात झाली. फक्त 50 रन्सवर 6 विकेट गेल्या होत्या. म्हणजे निम्मी टीम तंबूत परतली होती. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या वॉशिंग्टन सुंदरने खेळाचा नूरच पालटून टाकला. मदुरै पँथर्सच्या टीममध्ये जोश निर्माण केला. त्यांचा ढेपाळणारा डाव सावरला. टीमला लढता येईल, अशी सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.
30 चेंडूत मॅच विनिंग इनिंग
वॉशिंग्टन सुंदर फक्त 30 चेंडूत मॅच विनिंग इनिंग खेळला. त्याने नाबाद 56 धावा केल्या. यात 5 सिक्स आणि 2 फोर होते. सुंदरचा 186.66 चा स्ट्राइक रेट होता. या अवघड परिस्थिती सुंदरला टीममधील सहकारी पी. सर्वाननची साथ मिळाली. त्यानेही शेवटपर्यंत नाबाद राहत 22 धावा केल्या.
View this post on Instagram
सामन्याचा निकाल काय?
50 रन्सवर 6 विकेट गेलेल्या मदुरै पैंथर्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 141 धावा केल्या, चेपॉक सुपरसमोर 142 धावांच लक्ष्य ठेवलं. त्यांना विजयासाठी 12 धावा कमी पडल्या. चेपॉक सुपरने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 129 धावा केल्या. बॅटने वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली, तर चेंडूने अजय कृष्णाने 4 विकेट घेऊन साथ दिली.