IPL 2021: अखेर सनरायजर्सचा ‘विजयी सूर्य’ उगवला, राजस्थान संघावर 7 गडी राखून मात
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासून अत्यंत खराब प्रदर्शन करणाऱ्या हैद्राबाद संघाला अखेर विजय मिळवण्यात यश आलं आहे. आज त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाला मात दिली आहे.
IPL 2021: आयपीएलच्या (IPL 2021) 40 व्या सामन्यात गुणतालिकेत खालच्या स्थानांवर असलेल्या सनरायजर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) या संघात टक्कर होती. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात हैद्राबादने राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात बऱ्याच दिवसानंतर हैद्राबाद संघात पुनरागमन झालेल्या जेसन रॉय (Jason Roy) आणि कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) यांची अर्धशतकं हैद्राबादच्या विजयात महत्त्वाची ठरली.
सामन्यात सुरुवातीला फलंदाजी घेतलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने कर्णधार संजू सॅमसनच्या (Sanju Samson) अर्धशतकाच्या जोरावर 164 धावांपर्यंत मजल मारली होती. संजूने तुफान खेळी केली. पण त्याला इतर खेळाडूंची सोबत मात्र मिळाली नाही. ज्यानंतर हैद्राबादकडून मात्र सलामीवीर जेसन रॉयने (Jason Roy) अर्धशतक ठोकल्यानंतर अखेरच्या काही षटकात कर्णधार केनने अर्धशतक ठोकत संघाला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.
कर्णधार संजूची खेळी व्यर्थ
सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची पहिली विकेट त्वरीत गेल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने यशस्वी जैस्वालसोबत अर्धशतकी भागिदारी केली. पण यशस्वी बाद झाल्यानंतरही संजूने एकहाती खिंड लढवली. सर्व फलंदाज बाद होत असताना शेवटच्या षटकापर्यंत क्रिजवर राहत कर्णधार संजूने 82 धावांची दमदार खेळी केली. पण गोलंदाजांना दिलेल्या लक्ष्याआधी हैद्राबाद संघाला रोखता न आल्याने अखेर राजस्थान संघ पराभूत झाला.
जेसन रॉयचं दमदार अर्धशतक
आज हैद्राबाद संघानं मिळवलेल्या विजयात महत्त्वाची कामगिरी सलामीवीर जेसन रॉय याची होती. उशीरा संघात दाखल झालेल्या जेसन रॉयकडून जी अपेक्षा होती तशीच धमाकेदार कामगिरी त्याने केली आहे. त्याने दमदार असं अर्धशतक ठोकत संघाला एक उत्तम सुरुवात करुन दिली. रॉयने 42 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार ठोकत 60 धावा केल्या.
केनने फिनिश केला सामना
चांगल्या लयीत असलेला जेसन रॉय बाद झाल्यानंतर हैद्राबादचा युवा फलंदाज प्रियम गार्गही शून्यावर बाद झाला. ज्यानंतर संघ अडचणीत सापडला आहे असे वाटत होते. पण त्याचवेळी जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज केन विल्यमसनने हैद्राबाद संघाचा कर्णधार असल्याचं कर्तव्य बजावर अप्रतिम असं नाबा 51 धावांच अर्धशतक ठोकतं सामना जिंकवून दिला. त्याला अभिषेक शर्माने नाबाद 21 धावांची उत्तम साथ दिली. ज्यानंतर हैद्राबादने 7 विकेट्सने राजस्थानवर विजय मिळवला.
48 runs off 33 balls. A superb partnership between these two to take the team home ?#SRHvRR #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021 pic.twitter.com/zeIv2vO2b7
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 27, 2021
हे ही वाचा
IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती
(In Todays IPL match SRH won Over RR with 7 wickets)