West Indies vs Bangladesh: ‘UNLUCKY रस्सेल’, नॉनस्ट्राईकवर असतानाही झाला विचित्रपद्धतीने बाद, पाहा VIDEO

टी-20 क्रिकेट प्रकारातील टॉपचा फलंदाज असणाऱ्या आंद्रे रस्सेलला टी20 विश्वचषकात अजूनही हवा तसा फॉर्म गवसलेला नाही. त्यात बांग्लादेशविरुद्धतर तो अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला आहे.

West Indies vs Bangladesh: 'UNLUCKY रस्सेल', नॉनस्ट्राईकवर असतानाही झाला विचित्रपद्धतीने बाद, पाहा VIDEO
आंद्रे रस्सेल
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 7:43 PM

T20 World Cup 2021: आंद्रे रस्सेल (Andre Russell) कायम आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) त्याला हवी तशी काय किमान सुमारही कामगिरी करता येत नाहीये. कायम चौकार-षटकारांची बरसात करणारा रस्सेल यंदा दुहेरी संख्याही गाठण्यात अपयशी ठरत आहे. स्पर्धेत तो   3 सामन्यात मिळून 5 धावाही करु शकलेला नाही. बांग्लादेशने तर त्याला स्ट्राईकवरही येऊ दिलेलं नाही.

वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश सामन्यातही 13 व्या षटकात पोलार्ड रिटायर्ड हर्ट झाला असताना रस्सेल फलंदाजीला आला. तो नॉन-स्ट्राइकर एंडवर असताना स्ट्राइकवर रोस्टन चेज होता. त्यावेळी बांग्लादेशच्या तस्कीन अहमदने चौथा चेंडू फेकला असताना चेजने शॉट खेळला आणि चेंडू तस्कीनच्या बुटांना लागून थेट नॉन-स्ट्राइकरच्या येथील स्टम्प्सना लागला. त्यावेळी रस्सेल धाव घेण्यासाठी थोडा पुढे आला असल्याने तो बाद घोषित करण्यात आला. त्यामुळे त्याला खातं खोलणं तर दूर स्ट्राईकवरही येता आलं नाही.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

वेस्ट इंडिजचा रोमहर्षक विजय

बांग्लादेशने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्यानंतर बांग्लादेशच्या गोलंदाजानी चांगली कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला टिकू दिलं नाही. केवळ रोस्टन चेज (39) आणि निकोलस पूरन (40) यांनी टिकून फलंदाजी केल्यामुळे वेस्ट इंडिजने 142 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात खास झाली नाही. पण लिटॉन दासने 44 धावांची आक्रमक खेळी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेरच्या षटकात महम्मदउल्लाने नाबाद 31 धावा करत विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर बांग्लाेदेशला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

इतर बातम्या

Photos | ‘लिटील मास्टर’च्या टेस्ट डेब्यूची हाफ सेंच्युरी; कसा होता सुनील गावस्करांचा झंझावात?

T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय

दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर

(In West indies vs bangladesh match Andre russel got Runout on non strikers end)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.