Virat Kohli WTC Final 2023 : विराटने OUT झाल्यानंतर 2 मिनिटात केलं असं काम, सहन करणं खूप कठीण
Virat Kohli WTC Final 2023 : 'यांना खरच भारतीय क्रिकेटची काही पडलीय का?' विराट कोहलीचा 'तो' फोटो समोर आल्यावर चाहत्यांच्या संतापाचा पार चांगलाच चढलाय. विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर असं काय केलं?
लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती खूप खराब आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्यांवर टीम इंडिया आतापर्यंत फ्लॉप ठरलीय. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. दुसऱ्यादिवस अखेर टीम इंडियाची स्थिती 5 बाद 151 आहे. पहिल्या डावात रोहित शर्मा, (15) शुभमन गिल, (13) विराट कोहली, (14) चेतेश्वर पुजारा (14) फ्लॉप ठरले. आयपीएलमध्ये वाघ असलेल्या या प्लेयर्सची WTC च्या प्लॅटफॉर्मवर शेळी सारखी स्थिती आहे. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते नाराज होणं स्वाभाविक आहे.
काल दुसऱ्यादिवशी विराट आऊट झाल्यानंतरचा एक फोटो समोर आलाय. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते चांगलेच खवळले आहेत. त्यांची नाराजी सुद्धा स्वाभाविक आहे.
म्हणून चाहते विराटवर खवळले
मिचेल स्टार्कच्या बॉलिंगवर विराट बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर 2 मिनिटातच विराटच्या हातात प्लेट होती. विराट जेवत होता. विराट जेवतोय, हा प्रॉब्लेम नाहीय. पण विराटच्या चेहऱ्यावर तो बाद झाल्याचा जराही लवलेश नव्हता. त्यामुळे चाहते खवळले आहेत.
This is Virat Kohli and Shubman Gill chilling and laughing after throwing their wickets and leaving India in trouble in Final of an ICC tournament but somehow their fans will blame IPL for their bad performances where they clearly don’t seem to care much about Indian cricket team pic.twitter.com/Y5SaXRt4dh
— Y. (@CSKYash_) June 8, 2023
चाहत्यांचा भडकणं स्वाभाविक
विराट बाद झाला, ती कुठली साधी मॅच नाहीय. हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रश्न आहे. T20, वनडे वर्ल्ड कप असतो, तसं टेस्ट क्रिकेटमधली ही चॅम्पियनशिप आहे. या मॅचमध्ये विराट कोहलीचा असा फोटो समोर आला, तर चाहत्यांचा भडकणं स्वाभाविक आहे.
final me khelna nahi khana do chokli ko..
sbse jyda bhuka janwar ye kohli hai bs rohit ke 6s pack nahi isle trolled hota hai
what about this ? kohli who play for food and ipl
for him playing in ipl> playing for india#ViratKohli #wtc pic.twitter.com/OXNaIEhpL6
— Neha. (@ImNeha45) June 8, 2023
हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
विराट कोहलीकडून भरपूर अपेक्षा होत्या. आयपीएलमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला होता. अशा महत्वाच्या सामन्यात विराट कोहली 14 रन्सवर आऊट होईल, याचा कोणी विचार केला नव्हता. हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
Imagine if this was Rohit Kohli fans would’ve run riot Editing & posting mocking Now where’re they
Nb: I don’t find anything wrong in what Kohli doing but just checking where the Kohli fans are who used to say Rohit gets out early to eat pic.twitter.com/Xl10Suby7M
— DONTOMJAMES (@DONTOMJAMES) June 8, 2023
सचिन 3 दिवस जेवला नव्हता
विराट कोहलीच्या या फोटोनंतर सचिन तेंडुलकरच जुन वक्तव्य व्हायरल झालय. 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये लवकर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकर 3 दिवस जेवला नव्हता.