WTC Final : टॉवेल बांधून मैदानात उतरला मोहम्मद शमी, फोटो पाहून चाहते लोटपोट, म्हणाले सावरिया 2.0

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात पाचव्या दिवशी भारताला सामन्यात पुन्हा मजबूत स्थितीत घेऊन देण्यात मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) सिंहाचा वाटा होता.

WTC Final : टॉवेल बांधून मैदानात उतरला मोहम्मद शमी, फोटो पाहून चाहते लोटपोट, म्हणाले सावरिया 2.0
shami
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 1:41 PM

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत भारताकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्या निराळ्या लूकमुळे देखील प्रेक्षकांना चांगलेच एन्टरटेन केले आहे. पाचव्या दिवशी महत्त्वाचे चार विकेट घेत शमीने भारताला सामन्यात पुन्हा दमदार पुनरागमन करण्यास मदत करणाऱ्या शमीने थेट मैदानातच टॉवेल गुंडाळल्याने सर्वच अवाक झाले. चाहत्यांनी शमीचे टॉवेल बांधलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यावर कंमेट्सचा पाऊस पाडला आहे. (In WTC Final Mohammed Shami Wraps Towel In Live Match Fans Calls Him Sawariya)

सामन्यात लंचनंतर शमी मैदानावर परतला तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हाच थंडीचा तडाखाही वाढल्याने शमीने एक टॉवेल थेट छातीला लपेटला. त्यानंतर त्याच्याकडे कॅमेरा जाताच त्यालाही हसू आवरत नव्हता. दरम्यान हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी शमीची तुलना रणबीर कपूरचा सावरिया चित्रपटातील टॉवेल गुंडाळलेल्या लूकशी केली आहे.

शमीने नावे केला नवा रेकॉर्ड

मोहम्मद शमीने भारताचे माजी दिग्गज गोलंदाज मोहिंदर अमरनाथ यांचा रेकॉर्ड तोडला आहे. आय़सीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चार विकेट्स घेणारा शमी पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथ यांनी तीन विकेट्स घेतले होते. आता शमीने 4 विकेट घेत नवा रेकॉर्ड रचला आहे.

आतापर्यंतच्या सामन्याचा धावता आढावा

सर्वात आधी न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. भारताला 217 धावांवर ऑलआऊट करुन न्यूझीलंडने 249 धावा केल्या आणि भारतावर 32 रनांची आघाडी मिळवली. त्यानंतर भारत आता आपला दुसरा डाव खेळत असून पाचव्या दिवसाखेर भारताची स्थिती 64 वर 2 बाद अशी आहे. सध्या विराट (8) आणि पुजारा (12) खेळत आहेत.

हे ही वाचा :

WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

(In WTC Final Mohammed Shami Wraps Towel In Live Match Fans Calls Him Sawariya)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.