IND vs AUS : न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडिया क्लिन स्वीप, दोन्ही सामने गमावले, केएल राहुल फ्लॉप

Australia A vs India A 2nd unofficial Test Match Result : ऑस्ट्रेलिया ए ने टीम इंडिया ए ला बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी 2-0 ने क्लिन स्वीप केलं आहे.

IND vs AUS : न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडिया क्लिन स्वीप, दोन्ही सामने गमावले, केएल राहुल फ्लॉप
k l rahul india a vs australia a
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 2:09 PM

न्यूझीलंडने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केलं. त्यानतंर आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया ए ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया ए ने 4 दिवसीय पहिल्या सराव सामन्यामध्ये भारताला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या दोघांचा समावेश केला. ध्रुव जुरेल याने त्याची निवड सार्थ ठरवत दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. मात्र केएल राहुल, कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू इश्वरन हे तिन्ही फलंदाज अपयशी ठरले.

भारताचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यांची मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. इंडिया ए ने ऑस्ट्रेलिया ए ला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलिया ए ने हे आव्हान तिसऱ्या दिवशी 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलिया ए ने यासह 6 विकेट्सने दुसरा सामना जिंकला.

या दुसऱ्या अनऑफीशियल टेस्ट मॅचचं आयोजन हे मेलबर्न येथे करण्यात आलं. टीम इंडियाचे इतर फलंदाज अपयशी ठरले. मात्र ध्रुव जुरेल याने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करत पर्थ कसोटीसाठी रोहित शर्माच्या जागेसाठी आपला दावा ठोकला. ध्रुवने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 80 आणि 68 धावा केल्या. ध्रुवने दुसऱ्या डावात केलेल्या 68 धावांमुळे भारताला 229 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया एला 168 धावांचं आव्हान मिळालं.

ऑस्ट्रेलिया ए ची बॅटिंग

ऑस्ट्रेलिया ए ची निराशाजनक सुरुवात झाली. प्रसिध कृष्णा याने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर ऑस्ट्रेलियाला 2 झटके दिले. प्रसिधने मार्कस हॅरिस आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या दोघांना भोपळाही फोडून दिला नाही. त्यानंतर कॅप्टन नॅथन मॅकस्विनी याने 25 धावा केल्या. मुकेश कुमार याने नॅथनला आऊट केलं. त्यानंतर ऑलिव्हर डेव्हिस याला तनुष कोटीयन याने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ए ची 4 बाद 73 अशी स्थिती झाली. मात्र त्यानतंर सॅम कोन्स्टास आणि ब्यू वेबस्टर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 96 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.

ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग इलेव्हन : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, ऑलिव्हर डेव्हिस, जिमी पीअरसन (विकेटकीपर), मायकेल नेसर, नॅथन मॅकअँड्र्यू, स्कॉट बोलँड आणि कोरी रोचिचिओली.

इंडिया ए प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, साई सुदर्शन, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, तनुष कोटियन, खलील अहमद, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार.

पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.