Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन 2024 सुरु, BCCI Action मोडमध्ये, ‘या’ दोघांना बसणार पहिला फटका

बीसीसीआयच पहिलं पाऊल काय असेल? आणि त्यांनी कोणाला काय कल्पना दिलीय? जाणून घ्या...

मिशन 2024 सुरु, BCCI Action मोडमध्ये, 'या' दोघांना बसणार पहिला फटका
Team india
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 1:48 PM

मुंबई: पुढचा T20 वर्ल्ड कप दोन वर्षांनी होणार आहे. मिशन 2024 साठी बीसीसीआयने आतापासूनच कठोर पावल उचलण्याची तयारी केली आहे. पुढच्यावर्षी 2023 च्या सुरुवातीला टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 T20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. मागच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया भविष्याच्या दुष्टीने तयारी करणार आहे.

फक्त रोहित,विराटच नाही, तर….

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या T20 सीरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली टीमचा भाग नसतील. इनसाइडस्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. हार्दिक पंड्याची टी 20 टीमच्या कॅप्टनपदी कायमस्वरुपी नियुक्ती होऊ शकते. बीसीसीआयच्या अनऔपचारिक चर्चेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, आर.अश्विन आणि दिनेश कार्तिक यांना कळवलय की, यापुढे ते T20 टीमचा भाग नसतील.

जानेवारी महिन्यात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार के.एल.राहुल विवाहबद्ध होणार असल्याने, तो या मालिकेसाठी उपलब्ध नसेल.

आधीच कल्पना दिलीय

“डिसेंबरमध्ये नव्या निवड समितीची नियुक्ती होईल. टीम इंडियाच्या स्क्वाडबद्दल ते सर्व निर्णय घेतील. काही नावं मागे सोडून पुढे जावं लागेल, हे निश्चित आहे. रोहित, विराट बरोबर याबद्दल चर्चा झालीय” वरिष्ठ बीसीसीआय पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली.

शेवटची आयसीसी ट्रॉफी कधी जिंकली?

याआधी 2011 साली भारतात शेवटचा वनडे वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भारताने जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर भारताला एकाही वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवता आलेलं नाही. 2013 साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.

ते दोघे कॅप्टनशिपच्या शर्यतीत मागे पडले

केएल राहुल आणि ऋषभ पंत आपल्या खराब प्रदर्शनामुळे टी 20 फॉर्मेटमध्ये कॅप्टनशिप मिळवण्यात अपयशी ठरले. तेच हार्दिक पंड्याने आयपीएल 2022 पासून जबरदस्त कमबॅक केलं. त्याने आपल्या प्रदर्शनाने सर्वांचच मन जिंकलय. नवीन सिलेक्शन कमिटी आल्यानंतर टी 20 टीमचा कायमस्वरुपी कॅप्टन म्हणून त्याच्या नावाची घोषणा होऊ शकते.

रोहित कधीपर्यंत कॅप्टन पदावर कायम राहणार?

रोहित शर्मा आता 35 वर्षांचा आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत बीसीसीआय त्याला कॅप्टनपदी कायम ठेवेल. आता ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये जे सिनियर खेळाडू दिसले, ते 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये दिसणार नाहीत. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये झालेला पराभव खूपच जिव्हारी लागणारा होता. इंग्लंडने तब्बल 10 विकेटने टीम इंडियावर विजय मिळवला.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर.
विष्णुचा अवतार आहेत, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं; राऊतांची टीका
विष्णुचा अवतार आहेत, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं; राऊतांची टीका.
जमीन दान करणाऱ्यांकडूनही मंगेशकर रुग्णालयाने घेतले उपचाराचे 3 लाख
जमीन दान करणाऱ्यांकडूनही मंगेशकर रुग्णालयाने घेतले उपचाराचे 3 लाख.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?.
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ.
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.