IND vs AFG | Gulbadin Naib चं झंझावाती अर्धशतक, टीम इंडियाला धावांचं 173 आव्हान
India vs Afghanistan 2nd T20i 1st Innings Highlights | अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. अफगाणिस्तानने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या.

इंदूर | अफगाणिस्तानने टीम इंडियाला दुसऱ्या टी 20 सामन्यात विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट विकेट्स गमावून 172 धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला ठराविक अंतराने विकेट देत ऑलआऊट केलं. मात्र अफगाणिस्तानवर याचा काहीच फरक पडला नाही. अफगाणिस्तानने टीम इंडियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.