IND vs AFG | “ही त्याची भूमिका..”, रोहित विजयानंतर शिवमबाबत काय म्हणाला?
Rohit Sharma On Shivam Dube | शिवम दुबेने अफगाणिस्तान विरुद्ध सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकलं. त्यानंतर रोहित शिवमबाबत काय म्हणाला ते जाणून घ्या.

इंदूर | टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध दुसरा टी 20 सामनाही 6 विकेट्सने जिंकला. अफगाणिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हन दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 26 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 68 धावांचं योगदान दिलं. तर शिवम दुबे याने नाबाद 63 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे. तसेच शिवमला वर्ल्ड कप 2024 साठी संधी द्याला हवी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
तसेच विराट कोहली याने 29 धावांचं योगदान दिलं. रिंकू सिंह याने नाबाद 9 धावा केल्या. तर विकेटकीपर जितेश शर्मा आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. मात्र शिवम आणि यशस्वीने केलेल्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सामना आणि मालिका जिंकली. टीम इंडियाने या 3 सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचा हा खेळाडू म्हणून 150 वा टी 20 सामना होता. मुंबईच्या शिवम आणि यशस्वीने सामना जिंकून देत रोहितचा हा 150 वा सामना अविस्मरणी केला.
रोहितने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये शिवमबाबत प्रतिक्रिया दिली. “दुबे हा मोठा माणूस आहे. तो खूप ताकदवान आहे. शिवम फिरकीपटूंचा सामना करू शकतो. ही त्याची भूमिका आहे. शिवमने आमच्यासाठी दोनवेळा निर्णायक खेळी केली. शिवमने अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात नाबाद 60 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 17 जानेवारी रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.