IND vs AFG 2nd T20i | Rohit Sharma चा ऐतिहासिक रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच
INDIA vs Afghanistan 2nd T20i Rohit Sharma | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. रोहित असा कारनामा करणारा पहिलाच क्रिकेटर ठरला आहे.

इंदूर | टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे अफगाणिस्तान पहिले बॅटिंग करणार आहे. टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केलेत. शुबमन गिल आणि तिलक वर्मा या दोघांना बाहेर बसवण्यात आलं आहे. तर त्या जागी यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली या दोघांची एन्ट्री झाली आहे. रोहितने टॉससाठी मैदानात येताच वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. रोहित अशी कामगिरी करणारा पहिलाच पुरुष क्रिकेट ठरला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत रोहितचं अभिनंदन केलंय.
रोहितची ऐतिहासिक कामगिरी
अफगाणिस्तान विरुद्धचा दुसरा टी 20 सामना हा रोहित शर्माच्या टी 20 कारकीर्दीतील 150 वा सामना ठरला आहे. रोहितआधी कोणत्याही खेळाडूला 150 टी 20 सामने खेळता आलेले नाहीत. सर्वाधिक टी 20 सामने खेळण्याच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉलने आतापर्यंत 134 टी 20 सामने खेळले आहेत.
रोहितची टी 20 कारकीर्द
रोहित शर्माने टी 20 कारकीर्दीत 149 सामन्यांमधील 141 डावांमध्ये 139.15 च्या स्ट्राईक रेट आणि 30.58 सरासरीने 3 हजार 853 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 4 शतकं आणि 29 अर्धशतक लगावली आहेत. रोहितचा हायस्कोअर 118 इतका आहे.
रोहित शर्मा याचा कारनामा
Rohit Sharma makes his 150th appearance in T20Is 👏
He becomes the first men’s player to reach the landmark 🤩#INDvAFG pic.twitter.com/ZkLs9mQswI
— ICC (@ICC) January 14, 2024
सर्वाधिक टी 20 सामने खेळणारे खेळाडू
रोहित शर्मा, टीम इंडिया, 150 सामने
पॉल स्टर्लिंग, आयर्लंड, 134 सामने
जॉर्ज डॉकरेल, आयर्लंड, 128 सामने
शोएब मलिक, पाकिस्तान, 124 सामने
मार्टिन गुप्टील, न्यूझीलंड, 122 सामने
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.