टी 20 वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंची नावं जाहीर! कॅप्टन रोहितने सांगितंल….
Team India Icc World Cup 2024 | आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी अवघे काही महिने बाकी आहेत. त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडू निश्चित असल्याचं म्हटलंय.
बंगळुरु | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना आणि पहिली सुपर ओव्हर टाय झाली. त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजयी झाली. टीम इंडिया अशा प्रकारे 3 सामन्यांची मालिता 3-0 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा आणि रिंकू सिंह या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी केली. रोहितने नाबाद 121 आणि रिंकूने 69 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्ताननेही 212 धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला.
त्यानंतर पहिली सुपर ओव्हर टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडिया विजयी झाली. टीम इंडियाचा हा टी 20 वर्ल्ड कपआधीचा अखेरचा टी 20 सामना होता. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 14 महिन्यांनी आणि वर्ल्ड कपआधी मालिका जिंकली. सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटशनमध्ये माजी सहकारी झहीर खान, प्रज्ञान ओझा आणि इतरांसह संवाद साधला. या दरम्यान रोहित काय म्हणाला, हे आपण जाणून घेऊयात.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन हे संयुक्तरित्या अमेरिका आणि विंडिजमध्ये करण्यात आलंय. एकूण 20 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 29 जून रोजी करण्यात आलं आहे. 20 संघाना 5-5 नुसार 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएस आहे.
रोहित काय म्हणाला?
टीम इंडिया आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार आहे. आम्ही टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करु. मात्र बोलून काही होत नाही. त्यासाठी काय तयारी केलीय, याबाबतही रोहितने चर्चा केली. “आम्ही अजून टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची नावं निश्चित केलेली नाहीत. मात्र डोक्यात 8 ते 10 जणांची नावं आहेत, जे टीममध्ये असू शकतात”, असं रोहितने म्हटलं.
दरम्यान रोहितच्या बोलण्यावरुन अजून 2 विषय स्पष्ट झाले. ते म्हणजे टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 पैकी 8-10 खेळाडू कोण असायला हवेत, हे निश्चित आहे. राहिला विषय 5 जणांचा. तर या 5 जणांबाबत येत्या काळात निर्णय घेतला जाईल.