IND vs AFG Prediction: भारत अफगाणिस्तान सामन्यात या खेळाडूंवर असेल भिस्त, पॉइंटसाठी अशी निवड ठरू शकते बेस्ट
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात विजय मिळवून पुढची वाट सोपी करण्याचा टीम इंडियाचा मानस असेल. असं असताना स्वप्नपूर्तीसाठी कोणते खेळाडू बेस्ट ठरतील ते जाणून घेऊयात

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असून रंगतदार सामने होत आहे. सामना एकतर्फी झाला तरी 11 खेळाडू स्पर्धेत आपली एक छाप सोडतात. त्या जोरावरच नशिबाचं द्वार खुलं होतं असं म्हणायला हरकत नाही.भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात दुपारी 2 वाजता सामना सुरु होणार आहे. नाणेफेकीचा कौल दुपारी 1.30 वाजता होईल. त्यानंतर प्लेइंग इलेव्हन निश्चित होईल. पण संभावित प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्टवरून अंदाज बांधता येईल. याच मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला होता. दक्षिण आफ्रिकेने 428 धावांचा डोंगर रचला होता. तर या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने सर्वबाद 326 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारत अफगाणिस्तान सामन्यातही धावांचा वर्षाव होईल यात शंका नाही.
भारत आणि अफगाणिस्तान पिच रिपोर्ट
अरूण जेटली स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीला पूरक आहे. पण वेगवान गोलंदाज काही अंशी फलंदाजांना त्रास देऊ शकतात. मधल्या षटकात फिरकीपटू काही कमाल करू शकतात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर पहिली फलंदाजी करणं पसंत केलं जाईल. या मैदानावर पहिली फलंदाजी करणाऱ्या टीमचा एव्हरेज 220 धावा इतका आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले गेले आहेत. यात दोन सामन्यात भारताने विजय आणि एक सामना टाय झाला आहे. अफगाणिस्तान एकही वनडे सामना जिंकलेला आहे.
बेस्ट इलेव्हन 1
- विकेटकीपर: केएल राहुल आणि रहमानुल्लाह गुरबाज।
- फलंदाज: विराट कोहली (उपकर्णधार), रोहित शर्मा, इब्राहिम जादरान आणि रहमत शाह
- अष्टपैलू: हार्दिक पांड्या, मोहम्मद नबी, रविंद्र जडेजा और राशिद खान
- गोलंदाज: जसप्रीत बुमराह (कर्णधार)
बेस्ट इलेव्हन 2
- विकेटकीपर: केएल राहुल, इशान किशन
- फलंदाज: विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, इब्राहिम जादरान
- अष्टपैलू: रविंद्र जड़ेजा, हार्दिक पंड्या , राशिद खान (उपकर्णधार)
- गोलंदाज: कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारताची संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग 11 : रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.