IND vs AFG Video : रोहित शर्माची पंचांसोबतची मैदानातील ‘ती’ चर्चा माईकमध्ये रेकॉर्ड, बोलून दाखवलं मोठं दु:ख

कर्णधार रोहित शर्मा याची बॅट तिसऱ्या सामन्यात चांगलीच तळपली. टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने रोहित शर्माने कमबॅक केलं. पण पहिल्या दोन सामन्यात खातंही खोलता आलं नाही. पण तिसऱ्या सामन्यात नाबाद 121 धावांची खेळी केली.

IND vs AFG Video : रोहित शर्माची पंचांसोबतची मैदानातील 'ती' चर्चा माईकमध्ये रेकॉर्ड, बोलून दाखवलं मोठं दु:ख
IND vs AFG : रोहित शर्माने पहिल्या दोन सामन्यातील सळ तिसऱ्या सामन्यात केली व्यक्त, पंचांसोबतचं बोलणं माईकमध्ये रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 11:09 PM

मुंबई : रोहित शर्माने 14 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टी20 फॉर्मेटमध्ये कमबॅक केलं. त्याच्याकडे टी20 वर्ल्डकप संघाची धुरा देण्याच्या उद्देशाने हे कमबॅक झालं आहे. पण रोहित शर्माची कामगिरी पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक राहिली. पहिल्या सामन्यात शुबमन गिलसोबत संवाद तुटल्याने रनआऊट झाला. तर दुसऱ्या सामन्यात शून्यावर क्लिन बोल्ड होत तंबूत परतला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा तसंच काहीसं झालं तर टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. यासाठी रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात सावधपणे खेळत होता. पण सुरुवातीला काही चेंडू निर्धाव गेल्यानंतर त्याची चिंता रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. त्याने याबाबतचं दु:ख पंचांना हसत खेळत बोलून दाखवलं. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार आला. पण पंचांनी लेग बाय दिला. ही बाब रोहितच्या लक्षात आली तेव्हा त्याने पंचांशी संवाद साधला आणि ही सर्व बाब स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली.

कर्णधार रोहित शर्माने पंच वीरेंद्र शर्माशी संवाद साधत सांगितलं की, “अरे वीरू, पहिला लागला तो थाय पॅड होता का. इतकी मोठी बॅट लागली. एकतर इकडे 2-0 झाले आहेत. ” रोहित शर्मा सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्याची ही सळ होती. लेग बाय दिल्याने रोहितच्या खात्यात एकही धाव तेव्हा नव्हती. रोहित सुरुवातीला एक एक धाव घेण्यासाठी धडपड करत होता. त्यात 22 धावांवर 4 गडी बाद झाल्याने दडपण होतं ते वेगळं. अखेर रोहित शर्माला सूर गवसला आणि त्याला रिंकू सिंहची साथ लाभली.

रोहित शर्माने 69 चेंडूत नाबाद 121 धावा केल्या. या खेळीत 11 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. तर रिंकू सिंहने 39 चेंडूत 69 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह या जोडीने 190 धावांची भागिदारी केली. तसेच अफगाणिस्तानसमोर 212 धावा करत विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानच्या संघाने चिवट झुंज दिली आणि 6 गडी गमवून 212 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.