AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG | विराटच्या एन्ट्रीनंतर दुसऱ्या टी 20 तून कुणाचा पत्ता कट होणार?

India vs Afghanistan 2nd T20i | विराट कोहली पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नसल्याचं टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितलं होतं. तसेच विराट त्यानंतर उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध असेल, असंही द्रविड यांनी नमूद केलं होतं.

IND vs AFG | विराटच्या एन्ट्रीनंतर दुसऱ्या टी 20 तून कुणाचा पत्ता कट होणार?
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 5:17 PM

इंदूर | टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप 2024 आधी अखेरची टी 20 मालिका खेळत आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. विराट कोहली पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणामुळे खेळला नव्हता. मात्र तो दुसऱ्या सामन्यातून परतणार आहे. त्यामुळे आता प्लेईंग ईलेव्हनमध्ये विराट आल्यानंतर कुणा एकाला बाहेर पडावं लागणार आहे. तो कोण आहे, हे जाणून घेऊयात.

विराटच्या एन्ट्रीमुळे तिलक वर्मा याला बाहेर पडावं लागू शकतं. तिलकला पहिल्या सामन्यात विशेष काही करता आलं नाही. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने आता याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने 159 धावांचं आव्हान दिसं होतं. या धावांचा पाठलाग करताना तिलक तिसऱ्या स्थानी बॅटिंगला आला होता.

तिलक वर्मा याने 22 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. तिलकने या दरम्यान 2 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. तिलकच्या आधी कॅप्टन रोहित शर्मा हा झिरोवरच रन आऊट झाला. तर शुबमन गिल 23 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे परिस्थितीनुसार तिलकवर मोठी जबाबदारी होती. तिलकसाठी ही मोठी संधी होती. त्यानुसार, तिलकला चांगली सुरुवातही मिळाली. मात्र तिलक अपयशी ठरला. आता दुसऱ्या सामन्यात विराटच्या एन्ट्रीनंतर तिलकला बाहेर केलं जाऊ शकतं.

हे सुद्धा वाचा

आकाश चोप्रा काय म्हणाला?

“रोहित शर्मा आणि शुबमन गिल दोघेही आऊट झाल्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे या दोघांना पाठवण्यात आलं. तिलक योग्य पद्धतीने खेळत होता. मात्र त्यानंतर तिलक अझमतुल्लाहच्या बॉलिंगवर आऊट झाला. तिलकला पूर्णपणे संधीचा फायदा घेता आला नाही. मला वाटतं तिलक दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. विराट आणि यशस्वी दोघेही दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.आता यातून कोण बाहेर पडेल, हे सांगणं अवघड आहे. शिवम दुबेला बाहेर ठेवता येणार नाही. तर रिंकू सिंहला प्लेईंग ईलेव्हनमध्ये ठेवलं जाईल”, असं आकाश चोपा याने म्हटलं.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?.
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.