IND vs AFG : तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मनासारखं झालं, कर्णधार इब्राहिम झद्रानने सांगितलं की…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा टी20 सामन्यात बंगळुरुत सुरु आहे. या सामन्यात विजय मिळवून व्हाईट वॉश देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. पहिल्या दोन सामन्यात अफगाणिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. काहीच मनासारखं होत नव्हतं. पण तिसऱ्या सामन्यात हवं तसंच झालं आहे.

IND vs AFG : तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मनासारखं झालं, कर्णधार इब्राहिम झद्रानने सांगितलं की...
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 6:59 PM

मुंबई : भारत अफगाणिस्तान यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु झाला आहे. हा सामना जिंकून भारताचा व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न आहे. तर अफगाणिस्तानला काहीही करून हा सामना जिंकून लाज राखायची आहे. पहिल्या दोन सामन्यात अफगाणिस्तानच्या मनासारखं काहीच झालं नाही. नाणेफेकीचा कौलही टीम इंडियाच्या बाजूने लागला होता. पण तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल तर टीम इंडियाच्या बाजूने लागला. पण अफगाणिस्तानला हवं तसंच झालं. कारण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्णधार इब्राहिम झद्रान याचा जीव भांड्यात पडला. रोहित शर्मा काय निर्णय घेतो याकडे त्याचं लक्ष लागून होतं. रोहित शर्माने फलंदाजी घेताच त्याच्या चेहरा फुलला. सामना सुरु होण्यापूर्वी झद्रानने याबाबत आपलं मत मांडलं. तसेच तीन बदल केल्याचं सांगितलं.

“आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. आम्ही या मालिकेतून काही सकारात्मक गोष्टी घेतल्या आहेत. आम्ही आज आणखी काही प्रयत्न करु. आजच्या सामन्यात आम्ही तीन बदलही केले आहेत”, असं अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झद्रान याने सांगितलं. तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचं कारण स्पष्ट केलं होतं. “आम्ही प्रथम फलंदाजी करू. आम्ही पहिल्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजी केली होती. त्यामुळे आम्ही आज फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा विकेटशी काहीही संबंध नाही. फक्त काही कॉम्बिनेशन करून बघायचे आहेत आणि काही संधी द्यायला हव्यात. आम्ही तीन बदल केले असून संजू, आवेश आणि कुलदीप यांना संधी दिली आहे.”, असं रोहित शर्माने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.