AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | सूर्यकुमार यादव याचा झंझावात, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 2 विकेट्सने विजय

India vs Australia 1st Odi Highlights | टीम इंडियाने कांगारुंवर 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात मात केली आहे. सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाला कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला.

IND vs AUS | सूर्यकुमार यादव याचा झंझावात, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 2 विकेट्सने विजय
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 11:12 PM

विशाखापट्टणम | शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात क्रिकेट टीम इंडियाने विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूवर 1 धावेची गरज असताना फिनीशर रिंकू सिंह याने सिक्स ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. टीम इंडियाने हा सामना 2 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने 19.5 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांनी झंझावाती खेळी करुन टीम इंडियाला विजयाच्य उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. मात्र 20 व्या ओव्हरमधील 3 चेंडूमध्ये टीम इंडियाने सलग 3 विकेट्स गमावले. त्यामुळे सामना अखेरच्या बॉलपर्यंत पोहचला. मात्र रिंकूने सिक्स लगावल्याने टीम इंडियाचा विजय झाला. मात्र हा शेवटचा बॉल नो बॉल असल्याने टीम इंडियाचा असाही विजय झाला असता. या विजयासह सूर्यकुमार यादव याच्या कर्णधारपदाची सुरुवात विजयाने झाली आहे. तसेच टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

टीम इंडियाकडून कॅप्टन सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. ईशान किशन याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. रिंकू सिंह याने नाबाद 22 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल 21 रन्स करुन माघारी परतला. तिलक वर्मा 12 धावांवर बाद झाला. अक्षर पटेल 2 रन्स करुन आऊट झाला. तर ऋतुराज गायकवाड, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर मुकेश कुमार झिरोवर नाबाद परतला. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर सांघा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जेसन बेहरनडोर्फ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन एबोट यी तिघांनी 1 विकेट मिळवली.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाकड़ून स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्ट ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 31 धावांची खेळी केली. ही जोडी रंगात येण्यापूर्वी मॅथ्यू शॉर्टला बाद करण्यात रवि बिष्णोई याला यश आलं. 13 धावांवर असताना त्याचा त्रिफळा उडवून तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिस यांच्यात मोठी भागीदारी झाली. दोघांनी 130 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथने 41 चेंडूत 52 धावा केल्या. पण धावचीत होत तंबूत परतला. दुसरीकडे जोस इंग्लिसने 47 चेंडूत शतक ठोकलं. तसेच 50 षटकात 110 धावा करत प्रसिद्धच्या गोलंदाजीवर बाद झाला. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले. त्यानंतर स्टोइनिस 7 आणि टीम डेविड 19 धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघा.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीध कृष्णा.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.