VIDEO | “मला काय…”, भर मैदानात कॅप्टन रोहित शर्मा याचा पारा चढला
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर नागपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात 132 धावा आणि एका डावाने विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच संतापला होता.
नागपूर : टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 132 धावा आणि एका डावाने अफलातून विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. रवींद्र जडेजा याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं. दरम्यान सामन्यादरम्यान कॅप्टन रोहित शर्मा याचा संताप पाहायला मिळाला. रोहित शर्माने मैदानातच रौद्र रुप धारण केलं. रोहितचा हा संपूर्ण संताप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की काय झालं?
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या इनिंगमधील बॅटिंग सुरु होती. आर अश्विन दुसऱ्या डावातील 18 वी ओव्हर टाकायला आला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 52 अशी होती. अश्विनने दुसरा बॉल टाकला. यावर स्ट्राईक एंडवर असलेला पीटर हँड्सकॉम्ब एलबीडबल्यू झाला. अश्विन विश्वासाने अंपायरकडे अपील केलं.मात्र अंपायरने आऊट देण्याचा नकार दिला.
रोहित शर्मा संतापला
Mera ko kya dikha raha review dikha?? pic.twitter.com/7UMR2RdfZu
— Lala (@FabulasGuy) February 11, 2023
अंपायरच्या या निर्णयाला कॅप्टन रोहितने आव्हान दिलं आणि डीआरएस घेतला. संपूर्ण टीम इंडिया थर्ड अंपायरच्या स्क्रीनकडे डोळे लावून निर्णयाची वाट पाहत होती. या दरम्यान रोहितच्या चेहऱ्यावर कॅमेरा आला. त्यामुळे रोहित संतापला. त्यावेळेस रोहितची माझा चेहरा दाखवण्याऐवजी एलबीडबल्यूचा रिप्ले दाखवा असं त्याच्या हालचालीतून जाणवलं. पण या दरम्यान रोहितची चिडचिड झाली होती.रोहितची सर्व चिडचिड आणि संताप सोशल मीडियावर व्हायरल झाला.
रोहितचं शानदार शतक
दरम्यान नागपूर कसोटीत रोहित शर्माने शानदार शतक ठोकलं. रोहित या शतकासह वनडे, टी 20 आणि कसोटी अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. रोहितने पहिल्या डावात 120 धावांची खेळी साकारली.
फिरकी गोलंदाजाची अष्टपैलू कामगिरी
रोहिनंतर पहिल्या डावात अक्षर पटेल याने 84 आणि रवींद्र जडेजाने 70 धावा केल्या. आर अश्विनने 23 धावा जोडल्या. जडेजाने बॉलिंग करताना पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने दुसऱ्या डावात 5 आणि पहिल्या डावात 3 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.
दरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.