Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा याला आयसीसीचा दणका, ऑलराउंडरवर मोठी कारवाई
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात करत पहिल्या कसोटीत विजय सलामी दिली आहे. यासह मालिकेत आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूवर आयसीसीने कारवाई केली आहे.
नागपूर : टीम इंडियाने बॉर्डर गावसकर सीरिजमधील नागपूरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियावर 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकाबाजूला टीम इंडिया विजयाचं सेलिब्रेशन करत होती. मात्र आयसीसीने या आनंदावर विरजण टाकलं. आयसीसीने टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
नक्की कारवाई का?
रवींद्र जडेजा याने आयसीसीच्या आचरसंहितेचं उल्लंघन केलं. त्यामुळे आयसीसीने नियमांनुसार ही कारवाई केली आहे. त्यानुसार, आता जडेजाला नागपूर कसोटीच्या एकूण मॅच फीच्या 25 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
आयसीसीकडून रवींद्र जडेजा याच्यावर मोठी कारवाई
? JUST IN: India star handed penalty for ICC Code of Conduct charge during first Test against Australia!#WTC23 | #INDvAUS | Details ?
— ICC (@ICC) February 11, 2023
व्हायरल व्हीडिओत नक्की काय?
या व्हायरल व्हीडिओत जडेजा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 46 वी ओव्हर टाकायला आला होता. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. या व्हीडिओत जडेजा बॉलिंग टाकण्याआधी मोहम्मद सिराज याच्याकडे जातो. सिराजच्या हातावर मलमसदृश पदार्थ असतो. तो पदार्थ जडेजा बोटाने घेतो. जडेजा तो पदार्थ ज्या हाताने बॉल टाकतो त्या हातावरील बोटाला लावला. हा पदार्थ चिकट असल्याचं दिसून येतोय.
जडेजाने चिटींग केली की नाही, हा दुसरा मुद्दा. जडेजा बॉलला कुडतरत नसून तो हाताला मलम लावत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणंन आहे. मात्र तसं जरी असलं तरी जडेजाने तसं करण्याआधी फिल्ड अंपायर्सना विश्वासात घ्यायला हवं होतं, असंही काही नेटकऱ्याचं मत आहे.
जडेजाचा ऑलराउंड धमाका
जडेजाने दुखापतीनंतर या कसोटी मालिकेत जोरदार कमबॅक केलं. जडेजाने बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली. जडेजाने बॉलिंग करताना पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या डावात बॅटिंग करताना 185 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली.
दरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.