Ind vs Aus 1st Test : रोहित-द्रविडची ही कुठली चाल? एका महिन्यात 5 सेंच्युरी झळकवणाऱ्याला बसवलं बाहेर

Ind vs Aus 1st Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात या मालिकेतंर्गत एकूण चार कसोटी सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजच्या टेस्ट मॅचमध्ये टीम मॅनेजमेंटने एका मोठ्या खेळाडूला बाहेर बसवलं.

Ind vs Aus 1st Test : रोहित-द्रविडची ही कुठली चाल? एका महिन्यात 5 सेंच्युरी झळकवणाऱ्याला बसवलं बाहेर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 11:35 AM

Ind vs Aus 1st Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु झाली आहे. नागूपरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर पहिला सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात या मालिकेतंर्गत एकूण चार कसोटी सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांनी आज टेस्ट डेब्यु केला. आजच्या टेस्ट मॅचमध्ये टीम मॅनेजमेंटने एका मोठ्या खेळाडूला बाहेर बसवलं. जो मागच्या काही दिवसांपासून सातत्यपूर्ण प्रदर्शन करतोय. त्यामुळे टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे.

रोहित-द्रविडची ही कुठली चाल?

पहिल्या टेस्टच्या प्लेइंग 11 मध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी शुभमन गिलला स्थान दिलेलं नाही. शुभमन गिलने तिन्ही फॉर्मेटमध्ये मागच्या दोन महिन्यात शतकं ठोकली आहेत. केएल राहुलच्या पुनरागमनानंतर शुभमन गिलला पाचव्या नंबरवर संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. गिलने अलीकडे बांग्लादेश विरुद्ध कसोटी शतक झळकवल होतं. टीम मॅनेजमेंटने आज शुभमन गिलला बाहेर बसवून त्याच्याजागी टी 20 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला स्थान दिलय.

शुभमन जबरदस्त फॉर्ममध्ये

शुभमन गिलने मागच्या एक महिन्यात सर्वच फॉर्मेटमध्ये धमाकेदार खेळ दाखवला आहे. वनडेमध्ये ओपनिंग करताना त्याने एका सेंच्युरीसह तीन शतकं ठोकली आहेत. टेस्टमध्येही बांग्लादेश विरुद्ध एक शतक झळकवलय. टी 20 मध्ये शुभमन अजून चाचपडतोय असं वाटत होतं. पण ती उरली-सुरली कसर त्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात भरुन काढली. न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद 126 धावा फटकावल्या. सूर्यकुमार यादवने टी 20 वगळता दुसऱ्या कुठल्या फॉर्मेटमध्ये कमाल दाखवलेली नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी शुभमनला संधी मिळेल, असं वाटत होतं. पण टीम मॅनेजमेंटने सूर्याला संधी दिली. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11:

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.