IND vs AUS – नागपूरच्या विकेटवर काहीही होऊ शकतं, गुजरात-विदर्भ सामन्यात अनपेक्षित घडलं, सर्वांसाठीच धक्कादायक
IND vs AUS - ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज नेहमीच रोमांचक ठरली आहे. त्यामुळे ही टेस्ट सीरीज कमालीची रोमहर्षक होईल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. नागपूरमध्ये पहिल्या कसोटीपासून टेस्ट सीरीजची सुरुवात होईल.
नागपूर – भारत आणि ऑस्ट्रेलियातील कोट्यवधी क्रिकेट चाहते 9 फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहतायत. कारण या दिवसापासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज नेहमीच रोमांचक ठरली आहे. त्यामुळे ही टेस्ट सीरीज कमालीची रोमहर्षक होईल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. नागपूरमध्ये पहिल्या कसोटीपासून टेस्ट सीरीजची सुरुवात होईल. सामने भारतात होतायत, त्यामुले पीच स्पिनर्सना अनुकूल असेल, असा सगळ्यांचा अंदाज आहे. दोन्ही टीम्स त्याच दृष्टीने तयारी करतायत. पण या मॅचच्या 21 दिवस आधी जे घडलय, त्याने भारतासह ऑस्ट्रेलियाच टेन्शन नक्कीच वाढवल असेल.
या मैदानात असं काय घडलं?
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. विदर्भ क्रिकेट टीमच हे घरच मैदान आहे. आपल्या घरच्या मैदानावर विदर्भाने 19 जानेवारीला सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा विजय मिळवला. विदर्भाने फक्त 18 धावांनी सामना जिंकला. विदर्भाने गुजरातसमोर विजयसाठी फक्त 73 धावांच टार्गेट ठेवलं होतं. पण गुजरातची टीम अवघ्या 54 रन्सवर ऑलआऊट झाली. विदर्भाच्या स्पिनर्सनी या मॅचमध्ये कमाल केली.
ऑस्ट्रेलियावर भारतीय स्पिनर्सचा धाक
विदर्भाच्या या मैदानात भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याने 6 डावात 23 विकेट काढल्यात. त्याशिवाय रवींद्र जाडेजा आणि हरभजन सिंह या स्पिनर्सनी इथे सरस कामगिरी केलीय. सहाजिकच 9 फेब्रुवारीला दोन्ही टीम्स मैदानात उतरतील, तेव्हा टीममध्ये कमीत कमी 3 स्पिनर्सना संधी देतील.
अश्विन आणि जाडेजा इथला रेकॉर्ड पाहता या दोघांपासून ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका असेल. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोन डावखुऱ्या गोलंदाजांपैकी कोणाला संधी मिळाल्यास ते जास्त अडचण वाढवतील. ऑस्ट्रेलियन बॉलरचा कहर
2008 साली पहिल्या कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम आमने-सामने होत्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियन स्पिनर जेसन क्रेजाने 12 विकेट घेऊन खळबळ उडवून दिली होती. यावेळी ऑस्ट्रेलिया नॅथन लायनसह काही स्पिनर्सना घेऊन मैदानात उतरणार आहे.