IND vs AUS : Suryakumar Yadav च्या टीममधील स्थानाबद्दल रोहित शर्माच महत्त्वाच विधान

IND vs AUS 2nd ODI : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे मॅचमध्येही सूर्याला खातं उघडता आलं नव्हतं. त्यानंतर विशाखापट्टनममध्येही मिचेल स्टार्कने त्याची विकेट काढली. त्याला खातही उघडता आलं नाही. पराभवानंतर रोहित शर्मा स्पष्ट बोलला.

IND vs AUS : Suryakumar Yadav च्या टीममधील स्थानाबद्दल रोहित शर्माच महत्त्वाच विधान
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 7:57 AM

IND vs AUS 2nd ODI : विशाखापट्टनम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला. या मॅचमध्ये भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. भारताचा डाव 26 ओव्हर्समध्ये 117 धावात आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 11 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठलं. कॅप्टन रोहित शर्माने पराभवानंतर ,सूर्यकुमार यादवबद्दल विधान केलय. टीम इंडियाचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादव वनडेमध्ये सातत्याने अपयशी ठरतोय.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे मॅचमध्येही सूर्याला खातं उघडता आलं नव्हतं. त्यानंतर विशाखापट्टनममध्येही मिचेल स्टार्कने त्याची विकेट काढली. त्याला खातही उघडता आलं नाही.

सूर्यकुमारबद्दल आपलं मत मांडलं

सूर्यकुमार यादवचा फॉर्म पाहून त्याच्या टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. या दरम्यान रोहितने सूर्यकुमारबद्दल आपलं मत मांडलय. सध्या सूर्यकुमार यादवच्या टीममधील स्थानाला कुठलाही धोका नाहीय, हे रोहित शर्माने स्पष्ट केलय. वनडेमध्ये फॉर्म मिळवण्यासाठी चाचपडणाऱ्या सूर्यकुमारला ठाऊक आहे की, त्याला चांगलं प्रदर्शन कराव लागेल.

सूर्याची 16 वनडेमधील कामगिरी कशी आहे?

सूर्याने मागच्या 16 वनडेमध्ये एकही अर्धशतक झळकवलेलं नाही. न्यूझीलंड विरुद्ध 34 धावा हा त्याचा टॉप स्कोर आहे. “श्रेयस अय्यर कधी पुनरागमन करणार? ते ठाऊक नाही. त्याची जागा रिकामी आहे. तिथे आम्ही सूर्यलाच संधी देणार. त्याने मर्यादीत ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केलीय. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याला संधी मिळणार हे मी अनेकदा बोललोय” असं रोहित शर्मा म्हणाला. अजून सलग किती सामने संधी मिळेल?

“सूर्यकुमार यादवला वनडेमध्येही चांगली कामगिरी करावी लागेल. हे त्याला ठाऊक आहे. क्षमता असलेल्या खेळाडूंना कधीही असं वाटू नये की, त्यांना संधी मिळत नाहीय. मागच्या 2 सामन्यात तो लवकर आऊट झाला. पण त्याला आणखी 7-8 किंवा 10 सलग सामने संधी मिळाली पाहिजे. आता त्याला, दुसरा खेळाडू दुखापतग्रस्त आहे किंवा उपलब्ध नाहीय, तेव्हा संधी मिळतेय. खेळाडूंना संधी देणं हे टीम मॅनेजमेंटच काम आहे. जेव्हा धावा होत नसतील, तेव्हा आम्ही यावर विचार करु. सध्या आम्ही त्या मार्गावर नाही” असं रोहित शर्मा म्हणाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.