IND vs AUS | दुसऱ्या कसोटीआधी टीममध्ये घातक खेळाडूची एन्ट्री
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा अरुण जेटली स्टेडियममध्ये 17 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कांगारुंना 1 डाव आणि 132 धावांनी पराभूत केलं होतं. टीम इंडिया आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी गुडन्यूज समोर आली आहे. दुसऱ्या सामन्यात स्टार खेळाडूंच कमबॅक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला आशा आहे की तो दिल्ली कसोटीत खेळू शकतो. स्टार्क याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील नागपूर टेस्टला मुकावं लागलं होतं. स्टार्क याला ही दुखापत डिसेंबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंगदरम्यान झाली होती.
वेगवान गोलंदाज शनिवारी भारतात दाखल झाला. तसेच मंगळवारी दिल्लीत आपल्या सहकाऱ्यांमध्ये दाखल झाला. “सामना खेळण्याची उत्तम संधी आहे. पण मी खेळणार की नाही, हे वैद्कीय पथक, निवड समिती, कॅप्टन पॅट कमिन्स आणि कोच एंड्रयू मॅकडोनाल्ड यांच्यावर निर्भर आहे”, असं स्टार्क म्हणाला.
“माझी निवड व्हावी यासाठी मी 100 टक्के प्रयत्न करेन, मग मला संधी मिळू अथवा नाही”, असंही स्टार्कने नमूद केलं.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.