IND vs AUS Test : हो, शक्य आहे, आज शेवटच्या दिवशी टीम इंडिया बाजी मारु शकते
IND vs AUS Test : सर्वकाही त्या दोघांवर, हे कसं शक्य होईल, ते समजून घ्या. आतापर्यंत चार दिवस नीरस वाटलेल्या कसोटी सामन्यात आज अखेरच्या दिवशी रंग भरले जाऊ शकतात.
IND vs AUS Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला अखेरचा कसोटी सामना सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही टेस्ट मॅच सुरु आहे. आज कसोटी सामन्याचा पाचवा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 91 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात अजूनही 88 धावांनी पिछाडीवर आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. आज शेवटचा दिवस असल्याने ही टेस्ट मॅच ड्रॉ होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. पण क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं.
आतापर्यंत चार दिवस नीरस वाटलेल्या कसोटी सामन्यात आज अखेरच्या दिवशी रंग भरले जाऊ शकतात. आज जिंकायचं असेल, तर टीम इंडियाच्या गोलंदाजांना कमाल दाखवावी लागेल.
खेळपट्टी पूर्णपणे वेगळी
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे अजून 10 विकेट शिल्लक आहेत. त्यानंतर टीम इंडियाची दुसऱ्या इनिंगमधील बॅटिंग बाकी आहे. त्यामुळे ही टेस्ट मॅच ड्रॉ होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांवर नजर टाकल्यास अहमदाबाद टेस्ट मॅचसाठीची खेळपट्टी पूर्णपणे वेगळी आहे.
पहिली नागपूर कसोटी, त्यानंतर दिल्ली आणि इंदोर टेस्ट मॅचमध्ये सामना तीन दिवसात निकाली निघाला होता. खेळपट्टीवर चेंडू पहिल्या दिवसापासून टर्न होत होता. पण अहमदाबादची विकेट आतापर्यंत फलंदाजीला अनुकूल राहिली आहे. आज शेवटत्या दिवशी खेळपट्टीवर चेंडूला चांगला टर्न मिळाला, तर बाजी पलटू शकते.
टीम इंडियातील दोघांची भूमिका निर्णायक
टीम इंडियाची आज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या दोघांवर मुख्य भिस्त आहे. या मालिकेत या दोघांसमोरच ऑस्ट्रेलियन टीम हतबल दिसून आलीय. त्यांची फिरकी गोलंदाजी खेळणं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना झेपत नाही. त्यामुळे आज टेस्ट मॅचच्या शेवटच्या दिवशी त्यांची भूमिका निर्णायक असेल.
ही गोष्ट आजही घडू शकते
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाची फिरकी चालली, तर एका सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला जाऊ शकतो. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात हे दिसून आलय. एका सेशनमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा डाव संपवलाय. त्यामुळे ही गोष्ट आजही घडू शकते. विजय हवाच पण का?
चौथा कसोटी सामना जिंकल्यास, टीम इंडिया सीरीज जिंकेलच पण त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे आजचा दिवस टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, टीम इंडियाने शुभमन गिल (128), विराट कोहली (186) आणि अक्षर पटेल (79) धावांच्या बळावर पहिल्या इनिंगमध्ये 571 धावा केल्या. टीम इंडियाकडे 91 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 3 धावा झाल्या आहेत. 88 धावांनी ऑस्ट्रेलिया पिछाडीवर आहे.