IND vs AUS : अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियावर दुहेरी संकट, तुटू शकतो 3359 दिवसापूर्वीच वर्ल्ड रेकॉर्ड
IND vs AUS 4th Test : दोन्ही टीम्स आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील. कारण ऑस्ट्रेलियाला टेस्ट मॅच जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. त्याचवेळी टीम इंडियाला ही कसोटी जिंकून सीरीजसह WTC च्या फायनलमध्ये पोहोचायच आहे.
IND vs AUS 4th Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेली बॉर्डर-गावस्कर सीरीज आता अंतिम टप्प्यावर आली आहे. अहमदाबादमध्ये या सीरीजमधला शेवटचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही टीम्स आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील. कारण ऑस्ट्रेलियाला टेस्ट मॅच जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. त्याचवेळी टीम इंडियाला ही कसोटी जिंकून सीरीजसह WTC च्या फायनलमध्ये पोहोचायच आहे. टीम इंडिया सध्या सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. इथे प्रश्न खेळाडू आणि त्यांच्या प्रदर्शनाचा नाहीय, भारतात एक जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो. भारतात एक नवीन इतिहास रचला जाऊ शकतो.
तुम्ही विचार करत असाल, हा वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे? हा रेकॉर्ड स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक संख्येशी आहे. 3359 दिवसापूर्वी हा वर्ल्ड रेकॉर्ड रचला गेला होता. आता 3360 व्या दिवशी हे वर्ल्ड रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये अजून टेस्ट मॅच सुरु झालेली नसताना, रेकॉर्ड मोडण्याचे संकेत मिळतायत.
सध्या हे रेकॉर्ड कोणाच्या नावावर?
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या नावावर आहे. 3359 दिवसांपूर्वी म्हणजे 26 डिसेंबर 2013 रोजी या मैदानात प्रेक्षकांची एकूण संख्या 91092 होती. टेस्ट क्रिकेटमध्ये एकादिवसात स्टेडियममध्ये प्रेक्षक उपस्थितीचा हा रेकॉर्ड आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान Ashes सीरीजच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये हा रेकॉर्ड बनला होता.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मोडला जाणार वर्ल्ड रेकॉर्ड
आता या वर्ल्ड रेकॉर्डला धोका आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी हे रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो. याची अनेक कारण आहेत. सीरीजच्या दृष्टीने ही टेस्ट मॅच निर्णायक आहे. त्याशिवाय भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही देशाचे पंतप्रधान कसोटी सामन्यासाठी हजर असतील. आतापर्यंत किती तिकीटांचा विक्री
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची एकूण 1 लाख 32 हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसून हा सामना पाहू शकतात. आतापर्यंत 85 हजार तिकीटांची विक्री झाली आहे. त्यामुळे 10 वर्षापूर्वीचा MCG वरील रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो. प्रेक्षक संख्या 1 लाखापर्यंत पोहोचू शकते.