IND vs AUS : चौथा कसोटी सामना फिक्स होता? विराटच्या वक्तव्याने एकच खळबळ

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याला चौथ्या कसोटी सामन्यामध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराटच्या एका वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

IND vs AUS : चौथा कसोटी सामना फिक्स होता? विराटच्या वक्तव्याने एकच खळबळ
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 10:36 PM

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याला चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराट कोहलीने या सामन्यात पहिल्या डावामध्ये 186 धावांची दमदार खेळी केली. कोहली आणि गिल यांच्या मोठ्या खेळीमुळे सामना ड्रॉ राहिला नाहीतर निकाल बदलू शकला असता. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये अंतिम फेरी गाठायची होती. मात्र दुसरीकडे किवींनी लंकेचा पराभव करत भारताला फायनलचं तिकीट मिळवून दिलं. सामना झाल्यावर विराटने गेमप्लॅन कुठे बदलला याबाबत खुलासा केला आहे. विराटच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

आम्ही तिसऱ्या दिवशीही पॉझिटिव्ह माईंडसेटनेच खेळत होतो मात्र श्रेयस अय्यर बॅटींग करू शकणार नाही हे समजल्यावर गेमप्लॅन बदलला. आम्ही ऑस्ट्रेलियाला जास्त वेळ मैदानावरच फिल्डिंगसाठी ठेवलं आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती, असं विराट कोहलीने सांगितलं. एकंदरित विराटच्या बोलण्यावरून श्रेयस मैदानात फलंदाजीसाठी आला असता तर आक्रमक पवित्रा घेत मोठी धावसंख्या उभारत कांगारूंना दुसऱ्या डावासाठी बोलावत त्यांना लवकर गुंडाळून सामना जिंकायचा असा टीम इंडियाचा इरादा होता. मात्र असं काही झालं नाही कारण अय्यर मैदानात उतरूच शकला नाही.

विराटच्या सांगण्यावरून भारताने जास्त वेळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय सामना ड्रा करण्यात कामी आला. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना गमवायचा नव्हता. त्यामुळे टीम इंडियाने कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी सामना ड्रॉ करायचा हेच फिक्स केलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

विराटचं टीकाकारांना उत्तर-

माझ्या स्वतःच्या अपेक्षा माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. मी आधी मोठ्या खेळी खेळल्या आहेत. चांगल्या खेळपट्टीवर मी मोठी धावसंख्या करू शकेन, असा विश्वास मला होता होता. मी माझ्या पद्धतीने खेळलोय. मला वाटत नाही की मी कोणाला चुकीचे सिद्ध करावं, असं म्हणत विराटने मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.