IND vs AUS Test : टेस्ट फॉर्मेटमध्ये अश्विन एका मोठ्या रेकॉर्डच्या उंबरठ्यावर
IND vs AUS, 2023 : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबादच्या चौथ्या कसोटी सामन्यात महारेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
IND vs AUS 4th Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजचा चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या नावावर एका महारेकॉर्डची नोंद होऊ शकते. अश्विन चौथ्या कसोटीत अशी कामगिरी करुन नवीन इतिहास रचू शकतो. अहमदाबादमध्ये रविचंद्रन अश्विनकडे भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा एक मोठा रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे.
टेस्ट फॉर्मेटमध्ये अश्विनला मोठ्या रेकॉर्डची संधी
अश्विनने चौथ्या कसोटीत आणखी 5 विकेट काढले, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 112 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनेल. भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टेस्ट विकेट घेण्याचा रेकॉर्ड लेग स्पिनर अनिल कुंबळेच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनिल कुंबळेच्या नावावर 111 विकेट आहेत. रविचंद्रन अश्विनने चौथ्या कसोटीत 5 विकेट काढल्यास तो अनिल कुंबळेचा हा विक्रम मोडू शकतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
अनिल कुंबले – 111 टेस्ट विकेट
रविचंद्रन अश्विन – 107 टेस्ट विकेट
हरभजन सिंह – 95 टेस्ट विकेट
इतिहासातील पहिला असा गोलंदाज बनेल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याच्या रेकॉर्ड शिवाय भारतात खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 विकेट हॉलच्या बाबतीत अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडू शकतो. रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत भारतात खेळताना टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 25 वेळा 5 विकेट घेतले आहेत. अश्विनने या बाबतीत अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. अनिल कुंबळेने भारतात खेळताने 25 वेळा 5 विकेट काढल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने अहमदाबाद कसोटीत 5 विकेट काढल्यास तो नवीन इतिहास रचेल. असं केल्यास अश्विनच्या नावावर 26 वेळा 5 विकेट काढल्याची कामगिरी नोंद होईल. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 467 विकेट काढले आहेत. अश्विनने 113 वनडे सामन्यात 151 विकेट आणि 65 टी 20 मॅचेसमध्ये 72 विकेट काढलेत. आयपीएलच्या 184 सामन्यात 157 विकेट काढले आहेत.