IND vs AUS Test : काय चाललय, मॅच खेळणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियाच्या प्लेयर्सनाच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जाण्यापासून रोखलं
IND vs AUS Test : दोन्ही टीम्सच्या प्लेयर्सना स्टेडियमबाहेर का प्रॅक्टिस करावी लागली? काय आहे कारण? ज्या खेळाडूंमुळे हा सामना सुरु आहे, त्यांनाच आज सकाळी स्टेडियममध्ये प्रवेशापासून रोखण्यात आलं.
IND vs AUS 4th Test : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना सुरु आहे. आज या मॅचला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज उपस्थित होते. त्यामुळे या टेस्ट मॅचला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. आज टेस्ट मॅच सुरु होण्याआधी अशी एक घटना घडली, ज्यामुळे चाहते चांगलेच संतापलेत. ज्या खेळाडूंमुळे हा सामना सुरु आहे, त्यांनाच आज सकाळी स्टेडियममध्ये प्रवेशापासून रोखण्यात आलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथला आपल्या टीमसह स्टेडियमबाहेर जाऊन नेट्समध्ये सराव करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासाठी एक खास रथ बनवण्यात आला होता. त्या रथामधून त्यांनी संपूर्ण स्टेडियमला एक राऊंड मारली. त्यासाठीच या खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नाही. या राजकीय रॅलीमुळेच टॉसला थोडा विलंब झाला. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राजकारणी आणि त्यांच्या राजकारणाने टेकओव्हर केलीय, अशा प्रतिक्रिया चाहत्यांमधून उमटल्या आहेत.
Australian and Indian players have been warming up for the fourth Test outside the venue at the nets, restricted from using the outfield due to a stadium visit from the Prime Ministers of the two nations #INDvAUS pic.twitter.com/heXWm5tKkA
— cricket.com.au (@cricketcomau) March 9, 2023
बंदोबस्ताला किती पोलीस?
स्टेडियम बाहेर वॉर्म अप केल्यानतंर टॉसच्या काही मिनिट आधी खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला. दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेडियममध्ये असल्याने त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षाकवच होतं. जवळपास 3000 पोलीस सुरक्षा बंदोबस्तासाठी तैनात होते. नवीन रेकॉर्ड का?
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. अजून आकडे समोर आलेले नाही. पण एक नवीन विक्रम रचला जाऊ शकतो. जवळपास 1 लाख लोक स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 2013 साली Ashes test सीरीजमध्ये बॉक्सिंग डे ला 91,092 प्रेक्षक उपस्थित होते.