IND vs AUS : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध करणार ‘ऑपरेशन AAJ’, काय आहे हे ऑपरेशन?
IND vs AUS 4th Test : चौथा कसोटी सामना टीम इंडियासाठी 'करो या मरो'. ऑस्ट्रेलियाला हरवणं हाच टीम इंडियाचा या ऑपरेशनमागे उद्देश असेल. या ऑपरेशनमध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असेल.
IND vs AUS 4th Test : इंदोरच्या पीचवर डाव गडगडल्यानंतर टीम इंडिया एक खास ऑपरेशन करणार आहे. ऑस्ट्रेलियाला हरवणं हाच टीम इंडियाचा या ऑपरेशनमागे उद्देश असेल. या ऑपरेशनमध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असेल. अक्षर, अश्विन आणि जाडेजा. म्हणून याला आम्ही ‘ऑपरेशन AAJ’ नाव दिलय. A stands for अक्षर, दुसरा A stands for अश्विन आणि J फॉर जाडेजा. तुम्ही म्हणाल, हे तीन खेळाडूच का? या तीन खेळाडूंना निवडण्यामागे आणि या ऑपरेशनला ‘AAJ’ म्हणण्यामागे या खेळाडूंचे आकडे आहेत.
अक्षर पटेल अहमदाबादमध्ये दोन टेस्ट मॅच खेळलाय. दोन्ही टेस्ट मॅचमध्ये त्याने 9.30 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्यात. यात 11 विकेट त्याने एकाच कसोटी सामन्यात घेतले. अक्षरने या मॅचच्या पहिल्याडावात 6 आणि दुसऱ्याडावात 5 विकेट काढले. तोच मॅन ऑफ द मॅच ठरला होता. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या 3 कसोटी सामन्यात त्याने 185 धावा केल्यात. त्याच्या खात्यात फक्त 1 विकेट आहे.
अश्विनचा बोलबाला
अश्विन अहमदाबादच्या पीचवर 3 कसोटी सामने खेळलाय. 18.89 च्या सरासरीने त्याने 23 विकेट काढल्यात. अश्विनची जादू या मैदानात खूप चालते.
विकेट घेण्यात तो टॉपवर
जाडेजाची जादू सुद्धा या मैदानात खूप चालते. त्याने इथे अजूनपर्यंत एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही. पण या सीरीजमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत तो टॉपवर आहे. जाडेजाने 3 कसोटी सामन्यात 13.90 च्या सरासरीने 21 विकेट काढल्यात. जाडेजाची लेफ्ट आर्म गोलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी एक कोड बनलय. अहमदाबादमध्ये टीम इंडिया जास्त घातक
या स्पिन तिकडीला अहमदाबादच्या खेळपट्टीकडून बरीच मदत मिळेल. इंदोरप्रमाणे इथे पहिल्या दिवसापासून चेंडू वळणार नाही. पण ट्रॅक टर्निंग असेल. 2012 पासून टीम इंडिया इथे हरलेली नाही.