IND vs AUS Test : अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाल्यास टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचणार ? समजून घ्या पूर्ण समीकरण
IND vs AUS Test : इंदोर टेस्ट मॅच जिंकून ऑस्ट्रेलियन टीम आधीच WTC फायनलमध्ये पोहोचली आहे. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोण खेळणार? याचा निर्णय अजून झालेला नाही. भारत आणि श्रीलंका यापैकी एक टीम WTC फायनलमध्ये पोहोचू शकते.
IND vs AUS Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबाद टेस्ट मॅच जिंकल्यास सीरीज जिंकेलच, पण त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये थेट प्रवेश मिळेल. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना सध्या ज्या स्थितीमध्ये आहे, तिथे दोन्ही टीम्सच्या विजयाची शक्यता दिसत नाही. हा चौथा कसोटी सामना ड्रॉ होईल, असं चित्र आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला हा शेवटचा कसोटी सामना आहे. टीम इंडियाकडे मालिकेत 2-1 अशी आघाडी आहे. हा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकेल, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच काय? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
इंदोर कसोटीत भारतावर मात करुन ऑस्ट्रेलियाने आधीच WTC च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण दुसरी टीम अजून ठरलेली नाही. भारत आणि श्रीलंका यापैकी एक टीम फायनलमध्ये पोहोचू शकते. यावर्षी जून महिन्यात WTC ची फायनल होणार आहे. भारत-श्रीलंका दोन्ही टीम्सच WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्याच आपल-आपलं समीकरण आहे.
कसं आहे WTC Final चं समीकरण?
अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाल्यास किंवा भारताचा पराभव झाल्यास अशा स्थितीत श्रीलंके विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरीजच्या निकालावर अवलंबून रहाव लागेल.
श्रीलंकेला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये क्लीन स्वीप कराव लागेल. न्यूझीलंडने दोन पैकी एक कसोटी जिंकली किंवा टेस्ट सीरीज बरोबरीत संपली, तर अशा स्थितीत श्रीलंकेची टीम रेसच्या बाहेर जाईल व भारताच WTC फायनलच तिकीट पक्क होईल.
WTC पॉइंट्स टेबलची सध्याची स्थिती
ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. त्यामुळे फायनलमध्ये क्वालिफाय करणारी ती पहिली टीम ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने WTC सायकलमध्ये 11 मॅच जिंकल्या आहेत. 3 सामन्यात त्यांचा पराभव झालाय. 4 टेस्ट ड्रॉ झाल्यात. त्यांच्या विजयाची टक्केवारी 68.52 आहे.
WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारत-श्रीलंकेची स्थिती काय?
टीम इंडिया WTC पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 10 कसोटी सामने जिंकले, असून 5 टेस्टमध्ये पराभव झालाय. 2 टेस्ट मॅच ड्रॉ झालेत. भारताच्या विजयाची टक्केवारी 60.29 आहे. दक्षिण आफ्रिका 55.56 टक्क्यांसह तिसऱ्या आणि 53.33 सह श्रीलंका चौथ्या नंबरवर आहे. असं झालं तरी टीम इंडिया फायनलमध्ये
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टॉप 2 मध्ये रहाण आवश्यक आहे. आधी रँकिंग पॉइंट्सच्या हिशोबाने ठरायची. पण आता WTC मध्ये विजयाच्या टक्केवारीवरुन ठरेल. श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज 2-0 ने जिंकली आणि अहमदाबाद टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यास, श्रीलंकन टीम थेट फायनलमध्ये पोहोचेल. श्रीलंकेने सीरीज 1-0 ने जिंकली आणि भारतीय टीमने अहमदाबाद टेस्ट मॅच गमावली, तरी टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल.