IND vs AUS Test : चौथ्या टेस्टमध्ये रोहित अँड कंपनीला मन मारुन एक गोष्ट करावी लागेल, पण पर्याय नाही

IND vs AUS 4th Test : तिसऱ्या इंदोर कसोटीत अनपेक्षित पराभवाचा धक्का बसल्याने रोहित शर्मा आणि टीमला आपल्या नियोजित प्लानमध्ये महत्त्वाचा बदल करावा लागला आहे. खरंतर टीम इंडियाचे मनसुबे वेगळेच होते.

IND vs AUS Test : चौथ्या टेस्टमध्ये रोहित अँड कंपनीला मन मारुन एक गोष्ट करावी लागेल, पण पर्याय नाही
test team india
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 12:10 PM

IND vs AUS 4th Test : इंदोर कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 9 विकेटने पराभूत केलं. टीम इंडियासाठी हा अनेपक्षित पराभव आहे. हा पराभवाचा धक्का बसल्याने BCCI आणि रोहित शर्माला आपला प्लान बदलावा लागला आहे. WTC फायनलचा विचार करुन टीम इंडियाला अहमदाबादमध्ये हिरवीगार खेळपट्टी हवी होती. जेणेकरुन चांगली प्रॅक्टिस करता येईल. पण इंदोरच्या पराभवामुळे टीम इंडिया फिरकीला पोषक खेळपट्टी बनवण्याच्या जुन्या रणनितीनाच अवलंब करणार आहे. इंग्लंडच्या टीमसाठी अहमदाबादची खेळपट्टी जशी बनवली होती, तशीच विकेट बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी बनवण्यात येणार आहे. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला चौथा शेवटचा कसोटी सामना जिंकावाच लागेल.

टीम इंडियाला पुनरागमन करता आलं नाही

रोहित शर्माला इंदोर कसोटी जिंकून मालिकेत 3-0 ची विजयी आघाडी घेण्याचा विश्वास होता. पण पहिल्या इनिंगमध्ये मॅथ्यू कुहनेमनच्या डावखुऱ्या फिरकीसमोर टीम इंडियाचा डाव ढेपाळला. त्यानंतर या संपूर्ण सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करु शकली नाही. ऑस्ट्रेलियाचा नियमित कॅप्टन पॅट कमिन्स आई आजारी असल्याने मायदेशी गेला आहे. त्याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने टीमच नेतृत्व केलं.

सूत्राने काय सांगितलं?

“भारतीय टीम मॅनेजमेंटकडून आम्हाला कोणतीही सूचना मिळालेली नाही. प्रत्येक सीजमध्ये जशी खेळपट्टी बनवतो, स्थानिक क्युरेटर तशीच नॉर्मल विकेट आता बनवत आहेत” असं राज्य असोशिएशनच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माने WTC फायनलसाठी हिरव्यागार खेळपट्टीवर प्रॅक्टिसची इच्छा व्यक्त केली होती. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

शेवटच्या सामन्यावेळी अहमदाबादची विकेट कशी होती?

बीसीसीआय किंवा टीम मॅनेजमेंटकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही. त्यामुळे गुजरात क्रिकेट असोशिएशनचे क्युरेटर बॅटिंग विकेट बनवत आहेत. इथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या रणजी सामन्यात रेल्वेने गुजरात विरुद्ध 508 धावांचा डोंगर उभारला. आता सुद्धा अशीच विकेट बनवली जात आहे. इच्छा असून पण एक गोष्ट करता येणार नाही

नागपूर आणि दिल्ली दोन्ही कसोटी सामने तीन दिवसात निकाली निघाले. इंदोरचा कसोटी सामना सुद्धा तीन दिवसातच संपला. फक्त निकाल वेगळा लागला. आतापर्यंत फिरकीसमोर चाचपडणाऱ्या ऑस्ट्रेलियाने इंदोरमध्ये टीम इंडियालाच फिरकीच्या जाळ्यात फसवलं. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यात इच्छा असूनही टीम इंडियाला फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळाव लागणार आहे. कारण तेच टीम इंडियाच बलस्थान आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.