IND vs AUS : नागपूरच्या पीचला ऑस्ट्रेलियन टीमने घाबरलच पाहिजे, बघा आकडे काय सांगतात?
IND vs AUS Test : नागपूर टेस्टसाठी दोन्ही टीम्सची प्लेइंग 11 काय असेल, या बरोबर विकेट कशी असेल? याची चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियाला मुख्य टेन्शन नागपूरच्या पीचच आहे.
IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच काउंटडाऊन सुरु झालय. 9 फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम आमने-सामने असेल. नागपूरच्या मैदानात दोन्ही टीम्स समोरा-समोर येतील. नागपूर टेस्टसाठी दोन्ही टीम्सची प्लेइंग 11 काय असेल, या बरोबर विकेट कशी असेल? याची चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियाला मुख्य टेन्शन नागपूरच्या पीचच आहे. नागपूरच्या पीचवर सर्वात जास्त धोका आहे, तो टर्नपासून. तिसऱ्या आणि चौथ्या इनिंगमध्ये टर्नमुळे कुठल्याही टीमचा डाव 200 धावांच्या आत आटपू शकतो. अश्विन आणि जाडेजा या स्पिन जोडीपासून सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमच्या मनात भिती बसणं स्वाभाविक आहे.
ऑस्ट्रेलियाला भिती काय?
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमकडे अलीकडच्या काही वर्षात नागपूरमध्ये खेळण्याचा अनुभव नाहीय. वर्ष 2008 मध्ये ते इथे शेवटचा कसोटी सामना खेळले होते. भारतीय टीमने त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन टीमवर 172 धावांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा 15 वर्षांची तीच स्थिती होऊ नये, ही ऑस्ट्रेलियाला भिती आहे.
नागपूरच्या पीचचा इतिहास
नागपूरच्या पीचवर भारताने आतापर्यंत 5 टीम्स विरुद्ध 6 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 6 पैकी 4 टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवलाय. एका टेस्टमध्ये पराभव झाला. एक मॅच ड्रॉ झाली. म्हणजे इथे सामन्याचा निकाल लागण्याची गॅरेंटी आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याबद्दल लोकांमध्ये उत्सुक्ता आहे.
स्पिनर्ससाठी ‘स्वर्ग’
भारतीय विकेट्स टर्निंगसाठी ओळखल्या जातात. नागूपरमधील विदर्भ क्रिकेट असोशिएशनच स्टेडियम याचं उत्तम उदहारण आहे. स्पिन गोलंदाजांना इथे पहिल्या दिवसापासून मदत मिळते. त्यामुळेच या विकेटवर स्पिनर्सच्या खात्यात जास्त विकेट जमा होतात. चौथ्या-पाचव्या दिवशी बॅट्समनने मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. वर्ष 2015 मध्ये या विकेटवर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला होता. त्या सामन्यात भारतीय स्पिनर्सनी सर्व 20 विकेट घेतल्या होत्या. असंच वर्ष 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटीत अश्विन-जाडेजा जोडीने मिळून 13 विकेट घेतल्या होत्या. बॅटिंग खूपच कठीण
नागपूरमध्ये 6 कसोटी सामने झालेत. 20 इनिंगमध्ये फक्त 3 वेळा 500 प्लस धावसंख्या झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमधला हा स्कोर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीन बहुतांशवेळा 200 च्या आत ऑलआऊट झालीय.