IND vs AUS | टीम इंडिया विरुद्ध-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजमध्ये 2 स्टार खेळाडूंची एन्ट्री

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला येत्या 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

IND vs AUS | टीम इंडिया विरुद्ध-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजमध्ये 2 स्टार खेळाडूंची एन्ट्री
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 7:35 PM

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-1 ने विजय मिळवला. यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. या मालिकेत 2 मॅचविनर खेळाडूंची एन्ट्री होणार आहे. हे दोघेही कसोटी मालिकेतही होते. मात्र या दोघांना कसोटी मालिकेदरम्यान रिलीज करण्यात आलं होतं. त्यामुळे टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.

कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडू मालिकेतून बाहेर झाले त्यानंतर मायदेशी परतले. यातून 2 खेळाडू भारतात परतणार आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्पिनर एश्टन एगर याचं कमबॅक होणार आहे. हे दोन्ही खेळाडू मुंबईत आपल्या टीममध्ये दाखल होणार आहेत.

डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त

वॉर्नरला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून दुखापतीमुळे बाहेर मपडावं लागलं होतं. या सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद सिराज याने टाकेलला बॉल हा बॅट्समन वॉर्नरच्या हेल्मेटला लागला होता. तर एश्टन एगर याला कसोटी मालिकेदरम्यान देशांतर्गत सामन्यांसाठी रिलीज केलं होतं. मात्र आता एश्टन परततोय.

हे सुद्धा वाचा

स्टीव्ह स्मिथ कॅप्टन

दरम्यान या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्सऐवजी स्टीव्ह स्मिथ करणार आहे. पॅटच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळणार नाही. तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. यामुळे हार्दिक पंड्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई

दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम

तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई

या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.