IND vs AUS : चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज विनसाठी टीम इंडियासमोर ‘चॅलेंज 162’ पार करण्याच टार्गेट
IND vs AUS ODI Series : काय आहे हे 'चॅलेंज 162'? भारत आणि ऑस्ट्रेलियात वनडे सीरीज जिंकणार कोण? याच उत्तर चेपॉकवरच मिळेल. टीम इंडिया त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करु शकते का?
IND vs AUS : अनेकदा आपण जसा विचार करतो, तसं घडत नाही. वायजॅगमध्ये टीम इंडिया वनडे सीरीज जिंकेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण असं घडलं नाही. आता सीरीज विनसाठी चेन्नईतला सामना होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात वनडे सीरीज जिंकणार कोण? याच उत्तर चेपॉकवरच मिळेल. तिथे ‘चॅलेंज 162’ चा टीम इंडियाला सामना करावा लागणार आहे.
22 मार्च 2023 रोजी चेन्नीच्या चेपॉक मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम आमने-सामने असेल. हा सामना वनडे सीरीजचा विजेता ठरवणार आहे. टीम इंडियाला ‘चॅलेंज 162’ चा सामना करावा लागेल.
किती दिवस पूर्ण होतील?
तुम्ही विचार करत असाल हे ‘चॅलेंज 162’ काय आहे? याचा थेट संबंध टीम इंडियाने खेळलेल्या वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्याशी आहे. भारताने 11 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीजमधील डिसायडर सामना खेळला होता. टीम इंडियाने ही मॅच जिंकली होती. 22 मार्च 2023 पर्यंत या विजयाला 162 दिवस पूर्ण होतील.
टीम इंडियाला जमेल का?
भारताला चेन्नईत ऑस्ट्रेलियाला हरवायच असेल, तर पुन्हा तशीच कमाल दाखवावी लागेल. 162 दिवसांपूर्वी जो खेळ केला होता, तसच प्रदर्शन कराव लागेल. दिल्लीप्रमाणे चेन्नई जिंकावी लागेल. टीम इंडिया त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करु शकते का?
किती डिसायडर सामने भारताने जिंकेलत?
क्रिकेटमध्ये सध्याचे आकडे बघितले, तर उत्तर हो मध्येच असेल. भारताने 2019 पासून आतापर्यंत वनडे सीरीजमध्ये एकूण 6 डिसायडर सामने खेळले आहेत. यात 5 मॅचमध्ये विजय एकात पराभव झालाय. जिंकलेले सर्व 5 डिसायडर सामने होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी सहाव्यांदा यश मिळवाव लागेल. दोन्ही टीम्सचे चेन्नईतले आकडे काय सांगतात?
चेन्नईमध्ये दोन्ही टीम्समध्ये झालेले सामन्याचे आकडे काय सांगतात?. हा 50-50 ओव्हर्सचा सामना आहे. इथ 2 पैकी एक सामना भारताने, तर एक ऑस्ट्रेलियाने जिंकलाय.