IND vs AUS ODI : Hardik pandya च्या कॅप्टनशिपमध्ये टीम इंडियाने किती T20 सीरीज जिंकल्या?

IND vs AUS ODI : हार्दिक पंड्याचा ODI सीरीजमध्ये कॅप्टन म्हणून हा पहिलाच सामना आहे. त्याआधी हार्दिकने वर्षभरात टी 20 सीरीजमध्ये कॅप्चन म्हणून कशी कामगिरी केलीय, ते समजून घेणं आवश्यक आहे.

IND vs AUS ODI : Hardik pandya च्या कॅप्टनशिपमध्ये टीम इंडियाने किती T20 सीरीज जिंकल्या?
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 8:35 AM

IND vs AUS ODI : आजपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी पहिला वनडे सामना होणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाच प्रदर्शन, रिझल्टवर एक्सपर्ट्स आणि फॅन्सची नजर असेल. हार्दिक पंड्या टीमच नेतृत्व कसं करतो? यावरही लक्ष असेल. कारण कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याचा हा पहिला वनडे सामना आहे. हार्दिक पंड्या नियमित टी 20 टीमचा कॅप्टन आहे.

वनडेचा कॅप्टन रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिला वनडे सामना खेळणार नाहीय. टीमच्या उपकर्णधारपदी नियुक्त केलेल्या हार्दिक पंड्याला या मॅचमध्ये नेतृत्वाची संधी दिलीय.

हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडिया किती सीरीज जिंकली ?

हार्दिक आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात छोट्या टी 20 फॉर्मेटमध्ये टीमच नेतृत्व करतोय. तिथे त्याने आपल्या नेतृत्वगुणांनी प्रभावित केलय. हार्दिकने टी 20 फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाच टी 20 सीरीजमध्ये खेळली आहे. प्रत्येक सीरीजमध्ये विजय मिळवला आहे. हार्दिकच्या कॅप्टनशिपमध्ये टीम इंडिया 11 टी 20 सामने खेळली आहे. यात 8 मॅच टीम इंडियाने जिंकल्या आहेत. 2 मॅचमध्ये पराभव आणि 1 मॅच टाय झाली.

गावस्करांच हार्दिकबद्दल मत काय?

IPL 2022 मध्ये हार्दिक पंड्याने जबरदस्त नेतृत्व केलं. पहिल्याचा प्रयत्नात त्याने गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिलं. हार्दिकला आता वनडे फॉर्मेटमध्ये छाप सोडावी लागेल. सुनील गावस्कर यांनी सुद्धा हार्दिकच्या नेतृत्वगुणांच कौतुक केलं होतं. मधल्याफळीत हार्दिक पंड्या टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो मधल्याफळीत इम्पॅक्ट आणि गेम चेंजर खेळाडू ठरु शकतो.

तिच चांगल्या लीडरची ओळख

“हार्दिक पंड्या जबाबदारी घेण्यासाठी तयार असलेला खेळाडू आहे. तो पुढे येऊन लीड करतो. जे स्वत: करु शकत नाही, असं तो दुसऱ्या खेळाडूंना करायला सांगत नाही आणि तिच चांगल्या लीडरची ओळख आहे” असं गावस्कर कौतुक करताना म्हणाले. हार्दिकच्या नेतृत्वात असं काय खास आहे?

“हार्दिक पंड्याचे नेतृत्वगुण असे आहेत, ज्यामुळे दुसऱ्या खेळाडूंना तो आपला वाटतो. दुसऱ्या खेळाडूंना टेन्शन येणार नाही याची तो काळजी घेतो. त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. टीम इंडियाने आज पहिला वनडे सामना जिंकला, तर वर्ल्ड कपनंतर हार्दिकची वनडे टीमच्या कॅप्टनपदी निवड होऊ शकते” असं गावस्कर म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.