World cup 2023 | SuryaKumar Yadav साठी टीम इंडिया कोणाच बलिदान देणार?

World cup 2023 | सूर्यकुमारने त्याच्या 2 इनिंगमध्ये दिली सर्व प्रश्नांची उत्तर. सूर्यकुमारला मागच्या 19 महिन्यात अनेकदा संधी मिळाली. पण ODI मध्ये तो यश मिळवू शकला नाही. मात्र, तरीही त्याचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश केलाय.

World cup 2023 | SuryaKumar Yadav साठी टीम इंडिया कोणाच बलिदान देणार?
Ind vs Aus Suryakumar YadavImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 8:13 AM

चेन्नई : एमए चिदंबरम स्टेडियमवर 8 ऑक्टोबरला टीम इंडिया मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांची प्लेइंग 11 कशी असेल?, कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड कुठल्या खेळाडूंना संधी देतील?. मागच्या काही दिवसांपासून हा प्रश्न उपस्थित होत आहे. आशिया कपच्या विजयाने बऱ्याच प्रमाणात या प्रश्नाच उत्तर मिळालय. बुधवारी 27 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा वनडे सामना होईल. त्यावेळी सुद्धा काही प्रमाणात या प्रश्नाच उत्तर मिळू शकतं. आतापर्यंत ज्या अपेक्षित प्लेइंग इलेव्हनबद्दल चर्चा होत होती, त्याला सूर्यकुमार यादवने झटका दिलाय. सूर्यकुमार यादवच्या सलग दोन जबरदस्त इनिंगने प्रश्नचिन्ह निर्माण केलय. वर्ल्ड कप टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपली दावेदारी अधिक भक्कम केलीय. मागच्या दीड वर्षात सूर्यकुमार यादव वनडेमध्ये आपली छाप उमटवू शकला नव्हता. टीम इंडियाची मधल्या फळीची समस्या तो दूर करेल, म्हणून त्याला सातत्याने वनडेमध्ये संधी दिली जात होती.

एकूण 19 इनिंगमध्ये सूर्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, तरीही त्याचा वर्ल्ड कप स्क्वाडमध्ये समावेश करण्यात आला. इथेही त्याला फिनिशरचा रोल दिलाय. सूर्यकुमार आता वनडेमध्ये यशस्वी होताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मार्च महिन्यात सीरीज झाली. त्यावेळी सलग तीन वनडे सामन्यात तो खात उघडू शकला नाही. पण त्याच सूर्याने वनडे सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात सलग अर्धशतक झळकवलय. दोन्हीवेळा 6 व्या नंबरवर येऊन त्याने ही कामगिरी केलीय. मोहालीमध्ये कठीण स्थितीत येऊन सूर्याने केएल राहुलसोबत डाव संभाळला. 19 महिन्यानंतर वनडेमध्ये अर्धशतक झळकवलं. ही मॅच तो फिनिश करु शकला नाही. पण टीमला त्याने विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन सोडलं होतं.

कितव्या ओव्हरमध्ये सूर्या मैदानात आला?

इंदोर वनडेत सूर्यकुमारने फिनिशरच्या रोलला न्याय दिला. कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांना त्याच्याकडून जी अपेक्षा होती, तसाच खेळ त्याने दाखवला. टीम इंडियाची पहिली बॅटिंग होती. 41 व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार मैदानात उतरला, त्याने टी 20 स्टाइलमध्ये धुवाधार बॅटिंग केली. फक्त 37 चेंडूत त्याने 72 धावा कुटल्या. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 399 धावांचा डोंगर उभा केला. सूर्यकुमारचा खेळच वेगळा आहे. त्यामुळे वाईट काळातही टीम मॅनेजमेंट त्याच्या पाठिशी उभी होती. ….तर मग प्लेइंग 11 मधूवन कोण बाहेर जाणार?

आता प्रश्न हा विचारला जातोय की, सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार? की, या कामगिरीनंतरही त्याला प्रतिक्षाच करावी लागेल?. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवल्यास कोणाला बाहेर करणार? हा सुद्धा प्रश्न आहे. सद्य स्थितीत इशान किशनच्या जागेला धोका दिसतोय. कारण विकेटकीपिंगसाठी केएल राहुलचा पर्याय आहे. सद्य स्थितीत टीम इंडियाने बदलाचा विचार केला, तर हा एक पर्याय आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.