IND vs AUS: पराभवानंतर संतप्त चाहत्यांचे रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडीला फक्त 2 प्रश्न
काय आहेत ते दोन प्रश्न? रोहित-द्रविड जोडीकडे त्याची उत्तर आहेत का?
मुंबई: आशिया कपमधील निराशाजनक प्रदर्शनानंतर चाहत्यांचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजकडे लक्ष लागले आहे. मायदेशात टीम इंडिया मालिका विजय मिळवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पण टीम इंडियाची खराब सुरुवात झाली आहे. मोहालीमधल्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने आरामात पार केले.
प्लेइंग 11 चर्चेचा विषय का बनते?
पराभवानंतर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. कालच्या पराभवानंतरही फॅन्सनी रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडीला काही प्रश्न विचारलेत. प्रत्येक मॅचआधी आणि टॉसनंतर टीम इंडियाची प्लेइंग 11 चर्चेचा विषय बनते. कारण एखाद-दुसरी निवड आश्चर्यकारक असते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यातही हेच घडलं.
खात्री होती तेच घडलं नाही
काल टॉसनंतर रोहित शर्माने प्लेइंग 11 मधील बदल सांगितले. यात जसप्रीत बुमराहच नाव नव्हतं. खरंतर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेत खेळला नव्हता. ही मालिका त्याचा फिटनेस तपासण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जसप्रीत बुमराहचा समावेश होईल, अशी अनेकांना खात्री होती.
अडीच वर्षानंतर उमेश यादवला स्थान
पण जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा एकदा जसप्रीत बुमहारच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. उमेश यादवचा टीममध्ये झालेला समावेश अनेकांना खटकला. जवळपास अडीच वर्षानंतर उमेश यादवला टी 20 टीममध्ये स्थान मिळालं.
बुमराह आऊट आणि उमेश यादव इन असं का?
मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याने त्याच्याजागी उमेश यादवचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह आऊट आणि उमेश यादव इन असं का? असा प्रश्न एक्सपर्टसकडून विचारला जातोय.
दीपक चाहर का नाही?
टीम मॅनेजमेंटने जसप्रीत बुमराहने विश्रांती दिली हे एकवेळ समजून घेता येईल. पण उमेश यादवचा समावेश का केला? टी 20 वर्ल्ड कपसाठी स्टँडबाय खेळाडूंमध्येही उमेश यादव नाहीय. त्याच्याजागी दीपक चाहर किंवा अर्शदीप सिंह जास्त योग्य ठरले असते, क्रिकेट एक्सपर्ट्सकडून हेच प्रश्न विचारले जात आहेत.