IND vs AUS : Rahul Dravid यांच्या मनातही तीच भिती, म्हणून रोहितसाठी बोलावलं खास 10 प्लेयर्सना

IND vs AUS : नागपूरमध्ये ट्रेनिंग सेशन सुरु आहे. पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. कसोटीमध्ये टीम इंडियाची जशी बलस्थान आहेत, तशा कमकुवत बाजू सुद्धा आहेत.

IND vs AUS : Rahul Dravid यांच्या मनातही तीच भिती, म्हणून रोहितसाठी बोलावलं खास 10 प्लेयर्सना
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 1:24 PM

IND vs AUS Test : सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेची जोरदार तयारी करतेय. नागपूरमध्ये ट्रेनिंग सेशन सुरु आहे. पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. कसोटीमध्ये टीम इंडियाची जशी बलस्थान आहेत, तशा कमकुवत बाजू सुद्धा आहेत. स्पिन गोलंदाजीवर बॅटिंग हे कधी काळी टीम इंडियाच बलस्थान होतं. पण आता तीच कमकुवत बाजू ठरतेय. सध्याची टीम इंडिया स्पिन गोलंदाजी तितक्या सराईतपणे खेळत नाही. अनेक माजी क्रिकेटपटू सुद्धा याच्याशी सहमत आहेत.

राहुल द्रविडही सहमत असं वाटतं

सध्याची टीम इंडिया स्पिन बॉलिंग खेळताना चाचपडते, याच्याशी राहुल द्रविडही सहमत आहेत असं वाटतं. त्यामुळेच राहुल द्रविड यांनी नागपूरमध्ये प्रॅक्टिससाठी 10 स्पिनर्सना बोलावलय. रोहित शर्मा, विराट कोहली आणि अन्य बॅट्समनना नाथन लायन आणि कंपनीचा सामना करताना अडचण येऊ नये, हा राहुल द्रविड यांचा यामागे उद्देश आहे. वॉशिंग्टन सुंदरनंतर राहुल चाहर, सौरभ कुमार, जयंत यादव आणि पुल्कीत नारंग हे नागपूरमध्ये दाखल झालेत. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

नागपूरमध्ये असलेले स्पिन बॉलर्स कोण?

रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, सौरभ कुमार, जयंत यादव, पुल्कीत नारंग, साई किशोर, राहुल चाहर, वॉशिंग्टन सुंदर, वसीम जाफर काय म्हणाले?

टीम इंडियातील बहुतांश खेळाडू स्पिन गोलंदाजी व्यवस्थित खेळत नाहीत, असं टीम इंडियाचे माजी ओपनर वसीम जाफर म्हणाले. अशी एकवेळ होती, जेव्हा स्पिनर्सवर भारतीय फलंदाजांची दहशत होती. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण हे स्पिन गोलंदाजी उत्तमपणे खेळायचे असं जाफर म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.