INDvsAUS | भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टेस्टमधून 3 क्रिकेटर झटक्यात बाहेर, टीमचं टेन्शन वाढलं

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना हा 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या सामन्यातून 3 खेळाडू बाहेर झाले आहेत.

INDvsAUS | भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टेस्टमधून 3 क्रिकेटर झटक्यात बाहेर, टीमचं टेन्शन वाढलं
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 8:30 PM

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर सीरिजमधील पहिला सामना हा 9-13 फेब्रवारी दरम्यान पार पडणार आहे. सामन्याचं आयोजन नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर करणअयात आलं आहे. मात्र या पहिल्याच सामन्याआधी टीमचे 3 मोठे मॅचविनर खेळाडू हे बाहेर झाले आहेत. दुखापतीमुळे या तिघांना नागपूर कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. या तिघांच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलंय.

टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. श्रेयस दुखापतीतून अपेक्षेप्रमाणे बरा झालेला नाही. त्यामुळे श्रेयसची अनुपस्थिती टीमसाठी डोकेदुखी ठरु शकते. अय्यरसाठी 2022 हे वर्ष अविस्मरणीय असं राहिलं. अय्यरने 2022 मध्ये 17 वनडेत 724 धावा केल्या. यासह अय्यर टीम इंडियाकडून 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

तसेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सुद्धा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. स्टार्कला अंगठीच्या दुखापतीचा त्रास सहन करावा लागतोय. स्टार्कला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत दुखापत झाली होती. त्यामुळे स्टार्कला आफ्रिका विरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातही खेळता आलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा मॅचविनर खेळाडू आहे. स्टार्क ऑस्ट्रेलियाला एकहाती सामने जिंकवू शकतो. मात्र दुखापतीमुळे तो बाहेर असल्याने ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा झटकाच आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा फास्टर बॉलर जोश हेझलवूड याला पहिल्या 2 सामन्यांना मुकावं लागू शकतं. जोश आधीच पहिल्या सामन्यातून आऊट झाला आहे. इतकंच नाही, तर त्याचं दुसऱ्या सामन्यातही खेळणं अवघड वाटतंय.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.